लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी आणि भाजपचे उमेदवार सुमित बाजोरिया यांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे. या निवडणुकीत सर्व ४८९ मतदारांनी उपस्थिती दर्शवित शंभर टक्के मतदानाची नोंद केली.प्रा. तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेल्याने यवतमाळची जागा रिक्त झाली होती. त्यासाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली. शुक्रवारी जिल्ह्यातील सात केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळात मतदान प्रक्रिया पार पडली असून सर्व ठिकाणी शंभर टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. एकूण ४८९ मतदार आहेत. त्यामध्ये २४५ पुरुष तर २४४ महिला मतदारांचा समावेश आहे. सकाळच्या सत्रात उमरखेड व पुसदमध्ये मतदानाची टक्केवारी अनुक्रमे ३ व २२ असली तरी सायंकाळी मात्र मतदानाची टक्केवारी वाढली. सर्व शंभर टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. सातही मतदान केंद्रांवर पोलिसांकडून मतदारांची कसून तपासणी केली गेली. फोटो काढता येईल अशी कोणतीही आक्षेपार्ह वस्तू मतदान केंद्रात जाणार नाही, याची खास खबरदारी निवडणूक पथकाकडून घेतली गेली.महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी आणि भाजपचे सुमित बाजोरिया यांच्यात ही थेट लढत झाली. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला असून सुरक्षेच्या दृष्टीने मतदारांना सहलीही घडविण्यात आल्या. महाविकास आघाडीने आपल्या मतदारांकडून एकजुटीची शपथ घेतली. अवैध मतदान टाळण्याच्या दृष्टीने गुरुवारी नागपुरात मतदारांकडून प्रत्यक्ष मतदानाचे प्रात्यक्षिकही महाविकास आघाडीने करून घेतले. यवतमाळातील बचत भवनात ४ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. चतुर्वेदी बाजी मारतात की बाजोरिया याचा फैसला ४ फेब्रुवारीच्या मतमोजणीनंतरच होणार आहे.
चतुर्वेदी, बाजोरियांचे भाग्य मतपेटीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 6:00 AM
प्रा. तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेल्याने यवतमाळची जागा रिक्त झाली होती. त्यासाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली. शुक्रवारी जिल्ह्यातील सात केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळात मतदान प्रक्रिया पार पडली असून सर्व ठिकाणी शंभर टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. एकूण ४८९ मतदार आहेत. त्यामध्ये २४५ पुरुष तर २४४ महिला मतदारांचा समावेश आहे.
ठळक मुद्देविधान परिषद : शंभर टक्के मतदान, ४ फेब्रुवारीला मतमोजणी