आॅनलाईन लोकमतयवतमाळ : आयटी विभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे खोळंबलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या याद्या रविवारी रात्री उशिरा प्रसिद्ध झाल्या. सोमवारी युद्धपातळीवर याद्या तपासणीचे काम सुरू होते. याद्या तपासण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार आहे. यानंतर ४१ हजार शेतकºयांच्या खात्यात पैसे वळते होण्याची शक्यता आहे.२४ तासात ४१ हजार शेतकऱ्याच्या याद्या तपासून २७ नोव्हेंबरला दुपारी १ वाजतापर्यंत शेतकºयांच्या खात्यात २७१ कोटींची रक्कम वळती करण्याचे निर्देश सहकार विभागाला मिळाले होते. प्रत्यक्षात आयटी विभागात ताळमेळच नव्हता. यामुळे याद्यातील नावांचा प्रचंड घोळ रविवारी दिवसभर कायम राहिला. सोमवारी बँकेच्या ‘फॉर्मेट’मध्ये याद्या प्रसिद्ध झाल्या.काही मोजकीच नावे सोमवारी गटसचिवांपुढे आली. मंगळवारी आणि बुधवारी दिवसभर याद्यांच्या तपासणीचे काम चालणार आहे. यानंतर ४१ हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे चित्र स्पष्ट होणार आहे. यानंतरच २७१ कोटीची रक्कम शेतकऱ्यांच्या नावाने बँकेकडे वळती होणार आहे.जिल्हा उपनिबंधक ांचा ठिय्यायाद्या तपासणीच्या कामात कुठलाही गोेंधळ निर्माण झाल्यास तो दूर करता यावा म्हणून जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन आणि त्यांची यंत्रणा संपूर्ण कामकाजावर नियंत्रण ठेवून होती.आयटी विभागात ताळमेळ जुळेनासकाळची यादी दुपारी बदलणे आणि नंतर पुन्हा त्यात फेरबदल होणे या कारणाने यादी तपासणीच्या कामात मोठा गोंधळ उडत होता. राज्यभर अशीच अवस्था पाहायला मिळाली.येत्या दोन दिवसांत कर्जमाफीच्या आकड्यांचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा कसून काम करीत आहे.- गौतम वर्धन,जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ
कर्जमाफीच्या याद्यांची तपासणी सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 10:26 PM
आयटी विभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे खोळंबलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या याद्या रविवारी रात्री उशिरा प्रसिद्ध झाल्या.
ठळक मुद्देदोन दिवस लागणार : जिल्हा उपनिबंधकांची आयटी विभागावर नजर