शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

पोलीस तपासणी जीवावर बेतली?; चौकशीसाठी वारंवार थांबवलेल्या कारमधील चिमुरड्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 8:31 PM

Coronavirus Lockdown संचारबंदीत बळी गेल्याचा नातेवाईकांचा आरोप

-गजानन अक्कलवारयवतमाळ: संचारबंदीत चौकशीसाठी जागोजागी थांबवण्यात आलेल्या वाहनातील आजारी बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. रोहित अनिल सोळंके (दोन वर्षे) रा. माथावस्ती कळंब, असे या बालकाचे नाव आहे. एकुलता एक मुलगा दगावल्याच्या धसक्याने आई-वडिलांची प्रकृती बिघडली असून त्यांना कळंब ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील आठ दिवसांपासून रोहितची प्रकृती ठीक नव्हती. शुक्रवारी सकाळी १० वाजता ती आणखी बिघडली. रोहितला यवतमाळ येथे रुग्णालयात नेण्यासाठी वसाहतीमधीलच जीवन जवळकर यांची गाडी भाड्याने घेण्यात आली. यवतमाळ येथे डॉ.विनायक कुळकर्णी यांच्या रुग्णालयात जाताना ही गाडी यवतमाळ येथे पांढरकवडा बायपासवर पोलिसांनी अडवली. रुग्ण असल्याचे सांगितल्याने गाडी तत्काळ सोडण्यात आली. पुढे शारदा चौकात ती पुन्हा अडवली गेली. तिथे पोलिसांना गयावया करण्यात आली. इथे जवळपास आठ ते दहा मिनिटे गेली. तेथून निघाल्यानंतर अवधुतवाडी पोलीस ठाण्याजवळ अडवण्यात आली. याठिकाणी एक महिला पोलीस कर्मचारी व इतरांनी बरीच विचारपूस केली. एवढेच नाही तर, दवाखान्याची कागदपत्रेही मागितली. या तपासणीत जवळपास दहा मिनिटांचा वेळ गेला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर रोहित मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दहा-पंधरा मिनिटे आधी आणले असते तर, उपचार करता आला असता, असे डॉक्टरांनी म्हणताच आई-वडिलांनी हंबरडा फोडला. रोहितचे कलेवर कळंब येथे आणण्यात आले. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थित त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी चौकशीत वेळ घालवल्यानेच रोहित दगावल्याचा आरोप कुटुंबीयांकडून केला जात आहे. रुग्णांसाठी रस्ता मोकळा असावा - चालक कोरोनामुळे सर्वत्र बंदोबस्त आहे. ही गोष्ट आवश्यक असली तरी, रुग्णांना तत्काळ रस्ता मोकळा करुन देणे आवश्यक आहे. आज एका बालकाचा वेळेवर उपचार न झाल्याने मृत्यू झाला. यापुढे असा प्रकार होऊ नये, अशी प्रतिक्रिया चालक जीवन जऊळकर यांनी दिली. विशेष म्हणजे या सर्व प्रकाराचा व्हिडीओ जीवन जऊळकर यांनी समाज माध्यमावर पोस्ट केला.धक्का बसला- धनराज सोळंकेआमच्या घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने मोठा धक्का बसला. वेळेवर उपचार मिळाले असते तर कदाचिच रोहित वाचला असता. परंतु त्याला उपचार मिळवून देण्यात आम्ही कमी पडलो, अशी हताश प्रतिक्रिया रोहितचे काका धनराज सोळंके यांनी दिली. एसीपींनी मागितला अहवाल दरम्यान, या सर्व प्रकरणाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी संबंधित पोलिसांकडून मागितली आहे. कळंबचे ठाणेदार विजय राठोड यांनाही याबद्दलचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. 

अशी कोणतीही घटना घडली नाही. चालकाने सांगितलेल्या ठिकाणांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले आहे. चालकालाही चौकशीसाठी यवतमाळला पाचारण करण्यात आले. त्याची चौकशी केली जात आहे. - प्रदीप शिरस्कर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ.