यवतमाळ : येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून ५९ बाल वैज्ञानिकांची सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. प्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमात या बालवैज्ञानिकांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान, रमण विज्ञान केंद्र नागपूर, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने येथील रमाबाई आंबेडकर कन्या शाळा व अभ्यंकर कन्या शाळेत ४२ वे जिल्हा प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये प्राथमिक गटात प्राजक्ता गजानन निकम, माध्यमिक गटात नंदा पांडुरंग निकोडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. राम पंढरी कोटरंगे हासुद्धा बक्षिसाचा मानकरी ठरला. राज्य स्पर्धेसाठी बाल वैज्ञानिकांची निवड डॉ. नीलिमा पुराणिक, डॉ. प्रवीण जोशी, डॉ. रमजान विराणी, चंद्रकांत वाळके या परीक्षकाांी केली.समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डायटचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे होते. शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी अध्यक्षस्थानी होते. जिल्हा विज्ञान पर्यवेक्षिका नीता गावंडे, विस्तार अधिकारी अनिल शेंडगे, राजू मडावी, मुख्याध्यापिका शीला कोकाटे, प्रणिता काटेवाले, डॉ. नीलिमा पुराणिक, विजय विसपुते, सुरेंद्र कडू, चंद्रकांत वाळके, अरविंद देशमुख, श्याम पंचभाई, नागोराव चौधरी, भुमन्ना बोमकंटीवार, साहेबराव हटवार, सतीश काळे, वीणा भगत, विजय डांगे, नीलेश टिकले, नीलेश तायडे, एच.एस. काथोटे, गजानन दिघडे, आर.डी. होले आदी उपस्थित होते. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. (वार्ताहर)
बाल वैज्ञानिकांची राज्यस्तरावर झेप
By admin | Published: February 07, 2017 1:28 AM