लोकमत न्यूज नेटवर्कनेर : येथील दारव्हा रोडवर असलेल्या अनुसूचित जाती मुलांच्या शासकीय निवासी शाळा व वसतिगृहात विविध समस्या आहेत. त्यातही भाजीच्या नावाखाली केवळ पाणी मिळाले. या बेचव जेवणाला कंटाळून विद्यार्थ्यांनी बुधवारी रस्त्यावर येत थाली बजाओ आंदोलन केले. हा प्रकार बघून प्रशासनाने तातडीने विद्यार्थ्यांना दुसरे जेवण देत गप्प केले.येथील शासकीय वसतिगृह व निवासी शाळेत सहावी ते दहावीपर्यंतचे १६० विद्यार्थी आहेत. रोज सकाळी मुलांना पाणी असलेले दूध व केवळ एक बिस्कीट नाश्ता म्हणून दिले जाते. जेवणात पाण्याचे प्रचंड प्रमाण असलेले वरण आणि भाजी दिली जाते. भातात अळ्या, सोंडे निघतात. वसतिगृह सुरू होऊन महिना झाला तरी मुलांना पुस्तके मिळालेली नाही. अनेकदा मुलांना अर्धपोटी राहावे लागते. आंदोलनादरम्यान, हा सर्व प्रकार विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला. एवढे घडूनही वसतिगृह प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे वरिष्ठांनी अधीक्षकांना तक्रार दिली आहे.वसतिगृहाच्या स्वयंपाकगृहात घाणीचे साम्राज्य आहे. माशा, डास आणि दुर्गंधीयुक्त वातावरणात जेवण तयार केले जाते. या समस्या संदर्भात विद्यार्थ्यांनी वारंवार आवाज उठवूनही दुर्लक्ष करण्यात आले. परंतु बुधवारी जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचे मिळाल्याने मुलांनी संताप व्यक्त करीत ताट बजाओ आंदोलन केले. यावेळी वसतिगृहातील समस्यांचा पाढा विद्यार्थ्यांनी वाचला. त्यामुळे तात्पुरती जेवणाची व्यवस्था करण्यात आली. परंतु रोजचा प्रश्न कायमच आहे.प्रती मुलामागे ९९९ रुपये मिळतात. मात्र सध्याच्या महागाईची परिस्थिती बघता एवढ्या पैशात जेवण देणे शक्य नाही. तरीही आम्ही वसतिगृहातील विद्यार्थ्यांना नियमित जेवण देण्याचा प्रयत्न करू.- शीला सुधाकर गादेकर,भोजन कंत्राटदार, पुसदभोजनात बुधवारी भाजी बेचव व कच्ची होती. यामुळे मुलांनी आंदोलन केले. मी त्वरित नवीन भाजी करायला लावली. याबाबत कंत्राटदाराला सूचनाही दिली.- डी.व्ही. घावडे, अधीक्षक,शासकीय वसतिगृह, नेर
नेर शासकीय वसतिृहात मुलांचा टाहो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 9:50 PM
येथील दारव्हा रोडवर असलेल्या अनुसूचित जाती मुलांच्या शासकीय निवासी शाळा व वसतिगृहात विविध समस्या आहेत. त्यातही भाजीच्या नावाखाली केवळ पाणी मिळाले.
ठळक मुद्देथाली बजाओ आंदोलन : जेवण बेचव, पुस्तकांचा पत्ता नाही