लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : श्री चिंतामणी जन्मोत्सवानिमित्त निघालेल्या द्वारयात्रा मिरवणुकीत अख्खी कळंबनगरी न्हाऊन निघाली़ मिरवणुकीतील ऐतिहासिक, पौराणिक देखावे व नाटिका, आदिवासी-कोळी नृत्य, गणपती नृत्य, लेझीम, टिपरी नृत्य आकर्षणाचा केंद्रबिदू ठरले़ दहीहांडी कार्यक्रमाला हजारो भाविकांचा जनसागर उसळला होता.शोभायात्रेत मोरया कला मंडळाने सादर केलेला ‘श्री चिंतामणी देखावा’ साक्षात श्रीचे दर्शन घडवित होता. जिल्हा परिषद बेसिक शाळेचे गोंडीनृत्य, लेझीम व ढोलताशे ठेका धरायला लावणारे होते. श्रीच्या द्वारयात्रेत शंभराच्यावर महिला व पुरुष भजनी मंडळीने सहभागी झाले होते. जन्मोत्सव यशस्वीतेसाठी विश्वतांसह कळंबवासीयांनी पुढाकार घेतला.
चिंतामणीनगरी दुमदुमली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 9:35 PM