लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन प्राधान्य देत आहे. मात्र विद्यार्थ्यांनी देखील पदवीधर होताना कौशल्यधिष्ठीत अभ्यासक्रम निवडावा असे आवाहन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी येथे केले.राजकमल भारती कला आणि वाणिज्य व सुशिलाबाई भारती विज्ञान महाविद्यालयात आयोजित रोजगार भरती मेळावा आणि विस्तारीत बांधकाम लोकार्पण सोहळा ते बोलत होते. या मेळाव्यातून ३७८ जणांना रोजगार मिळाला आहे. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय भारती होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजीमंत्री अॅड. शिवाजीराव मोघे, आमदार राजू तोडसाम, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरीताई आडे, नगराध्यक्ष अर्चना मंगाम, सुशिला भारती, प्रियदर्शन भारती, डॉ.किरणताई भारती, आशा भारती, प्राचार्य डॉ. गोपाल अग्रवाल, सहायक संचालक पी.जी. हरडे, राजूदास जाधव, अनिल आडे, राजेंद्र शिवरामवार, प्रमोद कुदळे उपस्थित होते. यावेळी सिद्धार्थ भारती यांच्या हस्ते ना. रणजित पाटील यांचा सत्कार करण्यात आला. डॉ.संजय भारती यांनी आर्णी शहराच्या विकासाचा आढावा घेत विकासात्मक कामांबाबत सूचना केल्या. संचालन प्रा.मिलींद पांडे, प्रा.आर.डी. टेकाटे यांनी केले.रोजगार भरती मेळाव्यात जिल्ह्यातील उमेदवारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पुणे, औरंगाबाद, बारामती, हैदराबाद, मुंबई, जालना, नागपूर येथील २४ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. ११३१ विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. त्यापैकी ३७८ विद्यार्थ्यांना निवडपत्र देण्यात आले.
कौशल्यधिष्ठीत अभ्यासक्रम निवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 11:43 PM
युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन प्राधान्य देत आहे. मात्र विद्यार्थ्यांनी देखील पदवीधर होताना कौशल्यधिष्ठीत अभ्यासक्रम निवडावा असे आवाहन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी येथे केले.
ठळक मुद्देरणजित पाटील : भारती महाविद्यालयातील मेळाव्यात ३७८ जणांना रोजगार