लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सर्वधर्म समभावाची शिकवण आणि सण-उत्सवाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विविध कार्यक्रम घेतले जाते. ख्रिसमसनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले होते.पहिली व दुसरीचे विद्यार्थी विविध वेशभूषेत या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तिसरीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर गीत सादर केले, तर चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत नाटिका सादर करून उपस्थितांना जिंकले. यासाठी विद्यार्थ्यांना संगीत शिक्षिका विद्या वावरकर, नृत्यशिक्षिका प्रीती लाखकर, कोमल तलवार, अर्चना राऊत, मंजू शाहू यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाचे संचालन निशा जोशी यांनी, तर आभार वर्षा फुटाणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास यांनी आयोजकांचे कौतुक केले.
‘वायपीएस’मध्ये नाताळ उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 9:39 PM