आॅनलाईन लोकमतघाटंजी : नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत करावी, या मागणीसाठी विविध संघटनांनी घाटंजी येथे सोमवारी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. रविवारी बेलोरा येथील नवोदय विद्यालयाच्या परिसरात निखील रामप्रभू भरडे (१३) याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.गरीब कुटुंबातील तल्लख बुद्धीचा निखील नवोदय विद्यालयात सातव्या वर्गात शिकत होता. शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास त्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. विद्यालय प्रशासनाने पालकाला व पोलिसांना सूचना न देता त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला. तेथील डॉक्टरांनी निखीलला मृत घोषित केले. नातेवाईकांना हा प्रकार माहीत होताच ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. प्राचार्य, शिक्षक व कर्मचाºयांनी दुर्लक्ष केल्याने आपल्या मुलाला जीव गमवावा लागला असा आरोप नातेवाईकांनी केला. त्यानंतर पालकाने केलेल्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी रुग्णालयात चौकशी पंचनामा केला. विद्यालय प्रशासनावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रात्री पोलीस ठाण्यासमोर हजारो नागरिकांची गर्दी झाली होती. त्यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली.दरम्यान सोमवारी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना यांनी शहरातून मोर्चा काढला. मृत्यूची सीआयडी चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले. मुलाने आत्महत्या केल्याची माहिती सर्वप्रथम पालकांना का दिली नाही, असा सवालही या निवेदनातून करण्यात आला.जिल्हा प्रशासनाला निवेदनबेलोरा येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेच्यावतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी प्राचार्य व कर्मचाºयांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रोशन राणे, शुभांगी श्रीरामे, विक्की बगडे, नीलेश गायकवाड, निखील दांडेकर उपस्थित होते.