शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

मृत्यूप्रकरणाचा तपास सीआयडीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:05 PM

विनयभंगाच्या आरोपीचा पुसद शहर ठाणेदाराने केलेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकांनी केली. ठाणेदारावर कारवाई होईपर्यंत मृतदेह ठाण्यातून उचलणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.

ठळक मुद्देपुसदचा ठाणेदार निलंबित : आदेशाची प्रत घेतल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ/पुसद : विनयभंगाच्या आरोपीचा पुसद शहर ठाणेदाराने केलेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकांनी केली. ठाणेदारावर कारवाई होईपर्यंत मृतदेह ठाण्यातून उचलणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. अखेर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ठाणेदार अनिलसिंंह गौतम यांना निलंबित केले. तसेच या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडीकडे) सोपविल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.पुसद येथील आंबेडकर वार्डातील भीमा तुकाराम हाटे याच्या मृत्यूनंतर पुसदमध्ये तीव्र पडसाद उमटले. शुक्रवारी सायंकाळी दगडफेक झाली. त्याचा मृतदेह पुसद शहरात दाखल होताच नातेवाईकांनी तो शहर ठाण्याच्या प्रवेशव्दारावर ठेवला. ठाणेदारावर कठोर कारवाईचा आदेश मिळत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. काहींनी शहरात फिरून बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यामुळे बाजारपेठ शनिवारी कडकडीत बंद होती. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पुसद गाठून या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल यांच्या चौकशी अहवालावरून ठाणेदार अनिलसिंह गौतम यांना निलंबित केले. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय नियंत्रण कक्ष ठेवण्यात आले.या प्रकरणाचा पुढील तपास सीआयडीकडे सोपविण्यात आल्याचे पत्रही त्यांनी हाटे यांच्या नातेवाईकांच्या सुपूूर्द केले. यावेळी आमदार मनोहरराव नाईक उपस्थित होते. तूर्तास याप्रकरणी पुसद शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली. ठाणेदाराच्या निलंबनाचा आदेश व तपास सीआयडीकडे देण्यात आल्याच्या आदेशाची प्रत घेतल्यानंतर भीमा हाटे याच्या नातेवाईकांनी त्याचे पार्थिव उचलून त्यावर अत्यंसंस्कार केले. या घटनेमुळे शुक्रवारी रात्रीपासून पुसद शहर ठाणे परिसरात तणावाची स्थिती होती. एलसीबीचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी व त्यांचे पथक पुसदमध्ये तळ ठोकून होते.वडिलांनी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रारठाणेदार गौतमसह चार शिपायांनी भीमा हाटे याला पट्यांनी, लाथाबुक्क्यांनी, काठीने बेदम मारहाण केल्याची तक्रार मृताचे वडील तुकाराम हाटे यांनी मुख्यमंत्र्यासह पोलीस अधीक्षक, आमदार मनोहरराव नाईक यांच्याकडे केली. ३० एप्रिल रोजी जामिनीवर सुटल्यानंतर ५ मे रोजी भीमाची प्रकृती बिघडल्याने त्याला खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले. नंतर ७ मे रोजी सावंगी (मेघे) येथे नेले. दरम्यान, १७ मे रोजी त्याचा मृत्यू झाला. आमदार मनोहरराव नाईक, पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, डीवायएसपी अजयकुमार बंसल, ठाणेदार धनंजय सायरे, तहसीलदार डॉ. संजय गरकाल आदींनी भीमाच्या नातेवाईकांची समजूत काढली.

टॅग्स :Deathमृत्यू