लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिवासी म्हणजे जंगलात राहणारे लोक, ही भ्रामक कल्पना आहे. जमाना बदलतोय, तसे आदिवासीही उच्च शिक्षित होताहेत. नेमके याच बाबीकडे लक्ष वेधणारा सिनेमा तयार होतोय. तोही आपल्या जिल्ह्यात. पुसदमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण येत्या १ मार्चपासून सुरू होणार असून सिनेमाचे तंत्रज्ञ आणि कलावंतांची टिम दोन दिवसात पुसदमध्ये दाखल होणार आहे.‘आॅनलाईन मिस्टेक’ नावाचा हा सिनेमा विदर्भातीलच अरुण किनवटकर साकारत आहेत. निर्माता म्हणून त्यांचा हा पहिलाच सिनेमा असला तरी दमदार ‘स्टार कास्ट’ त्यांनी दिमतीला घेतली आहे. विदर्भातीलच डॉ. राज माने आणि विनोद संतोषराव डवरे चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून रविचंदन हे कॅमेरामन आहेत. गणेश यादव, रोहण पेडणेकर, प्रल्हाद चव्हाण, विशाल पाटील, आदिती कांबळे, साया काशिद, अस्मिता खटखटे यांच्या प्रमुख भूमिका राहणार असून नृत्य दिग्दर्शन नरेंद्र पंडित यांचे आहे. ही संपूर्ण चमू दोन दिवसात पुसदमध्ये उतरणार आहे.समाजाने दुर्लक्षित केल्यामुळे आदिवासी तरुण नक्षलवादाकडे का आणि कसे झुकतात, अशा संवेदनशील विषयावर या चित्रपटाचे कथानक बेतलेले आहे. आदिवासींची झोपडी आणि राजघराण्याचा महाल यातील सुंदर प्रेमकथा रेखाटण्यात आली आहे. आस्क मोशन फिल्मस्च्या या सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण यवतमाळ जिल्ह्याच्या निसर्गरम्य परिसरात पुसद तालुक्यात होणार आहे.अकोल्याच्या श्रीकृष्ण राऊतांचे गाणेपुसदमध्ये शूट होणाऱ्या ‘आॅनलाईन मिस्टेक’ या सिनेमात अकोला येथील प्रसिद्ध गझलकार श्रीकृष्ण राऊत यांची गाणी आहेत. त्यातील ‘माझ्या रानफुला’ हे गाणे नुकतेच दिनेश अर्जुना यांच्या संगीत दिग्दर्शनात तसेच स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली माडे यांच्या स्वरात रेकॉर्ड करण्यात आले आहे.
आदिवासींच्या जीवनावर पुसदमध्ये सिनेमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 9:55 PM
आदिवासी म्हणजे जंगलात राहणारे लोक, ही भ्रामक कल्पना आहे. जमाना बदलतोय, तसे आदिवासीही उच्च शिक्षित होताहेत. नेमके याच बाबीकडे लक्ष वेधणारा सिनेमा तयार होतोय. तोही आपल्या जिल्ह्यात. पुसदमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण येत्या १ मार्चपासून सुरू होणार असून सिनेमाचे तंत्रज्ञ आणि कलावंतांची टिम दोन दिवसात पुसदमध्ये दाखल होणार आहे.
ठळक मुद्दे‘आॅनलाईन मिस्टेक’ : नक्षलवादाकडे झुकणाऱ्या तरुणांचे कथानक, शुक्रवारपासून शूटिंग