शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
2
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
3
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
4
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
5
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
6
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
7
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
8
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
9
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
10
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
11
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
12
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
13
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
14
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
15
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
16
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
17
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
18
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
19
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
20
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला

दूषित पाण्यामुळे नागरिक धास्तावले

By admin | Published: April 16, 2017 1:03 AM

शहरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.

नाल्यांतून पाईप लाईन : गटारात कॉक, शौचालयालगत लिकेज, डायरियाचा धोका वाढलाशहरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. पाईप लाईन जागोजागी फुटल्याने त्यातून चक्क गटारांतील पाणी नळांव्दारे घरोघरी पोहोचत आहे. काही ठिकाणी कॉक असे गटारात गटांगळ्या खात आहे. याकडे जीवन प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत असल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.रूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळशहरात पाणीपुरवठ्यासाठी प्राधिकरणाने ३० हजार नळ जोडण्या दिल्या आहेत. पाणीपुरवठ्यासाठी शहराच्या विविध भागात पाईप लाईन टाकली. मात्र ती जीर्ण होऊन जागोजागी फुटली. अनेक ठिकाणी प्रचंड मोठे भगदाडच पडले. काही ठिकाणी पाईप लाईनवरच नाल्या आहेत. त्यातील सांडपाणी पाईप लाईनमध्ये शिरते. तेच पाणी नागरिकांना पोहोचविले जात आहे.ज्या दिवशी पाणी पुरवठा बंद असतो, त्या दिवशी सांडपाणी वहेच्या दाबाने पाईप लाईनमध्ये ओढले जाते. दुसऱ्या दिवशी नळ आल्यानंतर तेच दूषित पाणी विविध भागात पोहोचते. यामुळे शहरात सर्वत्र दूषित आणि गढूळ पाणीपुरवठा होत आहे. हा प्रकार गेलया अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र अद्याप जीवन प्राधिकरणाने त्याची दखल घेतली नाही. आत्ताही अनेक ठिकाणी गटारांमध्ये फुटलेल्या पाईप लाईन तशाच पाणीपुरवठा करीत आहे. पाणीपुरवठ्याच्या सर्व पाईप लाईनचे कॉक गटारांच्या शेजारीच बसविण्यात आले आहेत. तो कॉक सुरू केल्यानंतर संबंधित भागात पाणीपुरवठा सुरू होतो. कॉक सुरू करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही बाब माहिती आहे. मात्र याबाबतची सूचना ते कधीच प्राधिकरणाच्या वरिष्ठांना देत नाहीत का, असा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी सांडपाणी बाजूला सारत ते कॉक सुरू करतात. सांडपाण्यातूनच त्यांना जावे लागते. तरीही ते उपाययोजनांबाबत प्राधिकरणाला माहिती देत नाही. शहरातील अनेक ठिकाणी आता कॉकजवळ गटारे तयार झाली आहे. तेथे पाणी साचत आहे. त्यात आता अळ्या, पॉलीथीन व शेवाळ दिसून येत आहे. या गटारगंगेतील पाणी पाईप लाईनमधून घरांपर्यंत पोहोचत आहे. या दूषित पाण्यामुळे शहरातील आबालवृद्धांचे आरोग्य ध,क्यात सापडले आहे. डायरियासारख्या मोठ्या साथीचा उद्रेक होण्याची शक्यता बळावली आहे. तूर्तास अनेक नागरिकांना पोटदुखी, उलटी, हगवणीसारख्या आजारांना भंडावून सोडले आहे. यातून मोठी साथ निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. लिकेज असल्याचे कबूलप्राधिकरणाने शहरात ठिकठिकाणी पाईप लाईनमध्ये लिकेज असल्याचे कबूल केले आहे. १९७२ मध्ये टाकण्यात आलेल्या पाईप लाईनमुळे अनेक ठिकाणी लिकेज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच तक्रार झाल्यानंतर दुरूस्ती केली जाते, अशी मखलाशीही केली. आता संपूर्ण पाईप लाईन बदलावी लागणार असल्याचे प्राधिकरणाने सांगितले. आता ‘अमृत’मधून मोठी नवीन पाईल लाईन टाकणार असल्याचे प्राधिकरणाने सांगितले. मात्र त्यासाठी नेमका किती कलावधी लागेल, हे अद्याप कोडेच आहे.अंडरग्राउंड पाईप फुटलेसराफा लाईनमधील सांडपाणी वाहून नेणाऱ्या सर्व नाल्या अंडरग्राउंड आहे. त्यातूनच पाणीपुरवठ्याची पाईप लाईन गेली आहे. ही पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटली आहे. परिणामी या परिसरात पाणी पुरवठा होताना चक्क नालीच आधी धो-धो वाहते. फुटलेल्या पाईप लाईनमधून गटाराचे पाणीही लोकांच्या घरापर्यंत पोहोचते. वंजारीफैल परिसरात तर सार्वजनिक शौचालयालगतच पाईप लाईन फुटली आहे. त्यातूनच पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या परिसरातील जनतेच्या आरोग्याला सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. शिवाजी गार्डन परिसरात सांडपाणीशिवाजी गार्डनचा परिसरही वर्दळीचा आहे. तेथून सांडपाण्याची मोठी नाली गेली आहे. त्या बाजूलाच नळाचा कॉक आहे. पाणी पुरवठ्याच्या त्यातून शेकडो लिटर पाणी वाहते. पाण्याा प्रचंड अपव्यय होतो. इतर दिवशी गटारातील पाणी कॉकमध्ये शिरते. त्यातूनच पाणीपुरवठा केला जातो. निळोण्याने तळ गाठल्याने पाणी गढूळ-अभियंता बेलेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता सचिन बेले यांनी यवतमाळ शहराला गढूळ पाणीपुरवठा होत असल्याची स्पष्ट कबुली ‘लोकमत’शी बोलताना दिली. बेले म्हणाले, निळोणा धरणामध्ये आता केवळ चार टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हे अखेरचे पाणी असल्याने ते गढूळ येत आहे. त्यातच शहरातील पाईप लाईन ही १९७२ ची अर्थात ४४ वर्षे जुनी असल्याने ती अनेक ठिकाणी फुटली आहे. त्यातून दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी शहराच्या वेगवेगळ्या भागातून नेहमीच येतात. शेवटच्या टप्प्यातील पाणीसाठा असल्याने त्यावर प्रक्रिया करूनच पाणीपुरवठा सुरू आहे. पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीन व चुन्याच्या निवळीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. गढूळ पाण्याबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन उपाययोजना केली जात आहे. मात्र ३०३ कोटींची अमृत योजना कार्यान्वित झाल्यानंतरच शहराची या समस्येतून सुटका होण्याची शक्यताही अभियंता बेले यांनी वर्तविली. आर्णी मार्गावर साचले गटारयेथील बसस्थानकाकडून आर्णीकडे जाणारा मार्ग सर्वाधिक वर्दळीचा आहे. या मार्गावर एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर विविध दुकाने आहेत. तेथेच एक अन्नपदार्थाचेही दुकान आहे. या दुकानालगतच पाणीपुरवठ्याचा कॉक आहे. तेथे नळ सुरू होताच गटार साचते. सर्वत्र पाणी वाहते. दुकानदार त्त्यातच अंड्यांची टरफले फेकतात. त्यामुळे या गटारात अळ्या पडल्या आहेत. शेवाळही वाढले आहे. त्यामुळे लगतच्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाण्याचा अपव्ययपाण्याचा जपून वापर करण्याचे अवाहन करणाऱ्या प्राधिकरणाच्याच बुडाखाली अंधार आहे. लिकेजमुळे हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. पाईप लाईन फुटल्याने व लिकेजमुळे अनेक घरी नळांना पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. अनेकांनी यामुळे चक्क टील्लू पंप बसवून पाणी ओढणे सुरू केले. दुसरीकडे हजारो लीटर पाणी वाया जात आहे. प्राधिकरणाने याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.