याबाबत पुन्हा गावकऱ्यांनी सरपंचांनी व गावकऱ्यांनी वीज वितरण कंपनीला निवेदन दिले. जर वीज वितरणने यावर उपाययोजना केली नाही, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. सध्या पावसाचे वातावरण असल्याने थोडासुद्धा वारा किंवा पाऊस आला की, लगेच वीज पुरवठा खंडित होतो. तीन-चार तासानंतरच वीज पुरवठा सुरू करण्यात येतो. सध्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने क्लास सुरू आहे. मात्र अनेकदा रात्री वीज पुरवठा खंडित झाला की सकाळीच वीज पुरवठा सुरू होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेकदा ऑनलाइन वर्गाला मुकावे लागते. ५० वर्षांपासून विजेच्या तारा बदलविलेल्या नाही. अनेक ठिकाणी तारामध्ये झाडे शिरून आहे. तसेच अनेक ठिकाणचे खांबही झुकलेल्या अवस्थेतच आहे. दरवर्षी लाखो रूपये दुरूस्ती करण्यासाठी येतात. मात्र थातुरमातुर दुरूस्ती करून कंत्राटदारांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे आता वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन नियमित वीज पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
वीज वितरणाच्या मनमानी कारभाराने नागरिकांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 4:48 AM