शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

पुसद शहरातील नागरिक कोरोनामुळे भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 5:00 AM

गढी वॉर्डातील कोरोनाबाधित ६० वर्षीय इसमाचा सोमवारी पहाटे यवतमाळ येथे मृत्यू झाला. दुसऱ्याव्यक्तीवर यवतमाळात उपचार सुरू आहे. दरम्यान कोरोनाबाधित मृत्यू झालेल्या रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या आठ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच वसंतनगरातील कोरोना रुग्णाच्या पत्नी व मुलालाही क्वारंटईन केले आहे.

ठळक मुद्देसंसर्गाचा धोका : एका ६० वर्षीय इसमाचा मृत्यू, दुसऱ्यावर उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहरातील गढी वॉर्डातील कोरोनाबाधित रुग्णाचा सोमवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे शहरातील नागरिक भयभीत झाले आहे. प्रशासनाने शहराचा काही भाग पुन्हा सील केला आहे.गढी वॉर्डातील कोरोनाबाधित ६० वर्षीय इसमाचा सोमवारी पहाटे यवतमाळ येथे मृत्यू झाला. दुसऱ्याव्यक्तीवर यवतमाळात उपचार सुरू आहे. दरम्यान कोरोनाबाधित मृत्यू झालेल्या रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या आठ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच वसंतनगरातील कोरोना रुग्णाच्या पत्नी व मुलालाही क्वारंटईन केले आहे. आतापर्यंत तालुक्याच्या ग्रामीण भागात नऊ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. मात्र शहरात प्रथमच कोरोनाबाधित रुग्ण आढळला. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याने पुसदकर धास्तावले आहे.गेले अडीच महिने प्रशासनासह नागरिकांनी प्रामाणिकपणे लॉकडाऊनचे पालन केले. मात्र त्यात शिथिलता मिळताच परजिल्हा व परराज्यातून स्वगृही येणाऱ्यांची संख्या वाढल्याने तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला. आता एकाचा मृत्यू झाल्याने नागरिक दहशतीत आहे. दरम्यान, वसंतनगर येथील पोलीस कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या भीतीत भर पडली आहे. क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींचा अहवाल येणे बाकी आहे. त्यांचा शहरातील इतर नागरिकांशी संपर्क आल्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. दरम्यान, शहरातील एकूण २७ जणांना क्वारंटाईन करून पाच क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आले.लगेच फिवर क्लिनिकमध्ये तपासणी करावीताप, सर्दी, खोकला आदी आढळल्यास संबंधित व्यक्तीने लगेच कोरोना केअर सेंटरमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी केले. वेळीच उपचार घेतल्यास रुग्ण बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी फिवर क्लिनिकमध्ये जावून तपासणी करून घ्यावी असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या