पुसद : गोरगरिबांना हक्काच्या जागेसाठी नमुना ड द्यावा, घरकुलाचे थकीत हप्ते द्यावे यासाठी गेल्या १७ दिवसांपासून पालिकेपुढे उपोषण सुरू आहे. तरीही प्रशासन दखल घेत नसल्याने गुरुवारी ‘ताला ठोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी पालिकेला टाळे ठोकण्यासाठी हजारो नागरिक एकवटल्याने पालिकेच्या गेटवर मोठा राडा झाला. पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. तर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने आंदोलक शांत झाले.
घरकुलाचा विषय घेऊन महाविकास आघाडीच्या वतीने गेल्या १७ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले. गुरुवारी प्रशासनाची झोप उडविण्यासाठी ‘ताला ठोको’ आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. गुरुवारी नगरपालिकेला ताला ठोकण्यासाठी सकाळी १० वाजतापासून हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष आंदोलकांनी नगरपालिकेच्या गेटवर गर्दी केली होती. नमुना ड मिळवून देण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने युद्ध पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मिळाले. तसेच घरकुलाचा थकीत असलेला निधी १५ दिवसाचे आत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करीत असल्याचे प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात आले. परंतु मागण्या पूर्ण न झाल्यास १७ फेब्रुवारीला ताला ठोको आंदोलन करणारच असल्याचा इशारा देण्यात आला. तोपर्यंत साखळी उपोषण चालूच राहणार असल्याचेही सांगण्यात आले.
आंदोलकांची आक्रमक भूमिका पाहता पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. आंदोलनासाठी राष्ट्रवादीचे (शरद पवार गग) शहर अध्यक्ष साकीब शाह, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, शहराध्यक्ष जयानंद उबाळे, विजय बाबर, अर्जून राठोड आदींनी पुढाकार घेतला. या आंदोलनामध्ये सलीमभाई, दीपक अवचार, माधव वैद्य, मारोती भस्मे, आयुब पटेल, ज्ञानेश्वर वाढ, सिद्दिकी जोया, ॲड. अभिषेक रुडे, नवाज अली, जहिरमामू, सय्यद इस्तियाक, इम्रान पटेल, बाबाराव खिल्लारे, कमल पाईकराव, शेख वाजेद अक्रम, वैशाली भगत, सुशीला जोशी, पुष्पा मनवर, सांची भगत, लता वाकोडे, साधना वाठोरे, साधना भगत, देवका राठोड, संगीता पाईकराव, अर्जुन भगत, भास्कर बनसोड, गौतम भगत, राजरत्न लोखंडे, अरुण राऊत, मधुकर सोनवणे, निवृत्ती थोरात, ललिता पोघे, ललिता गाडगे, दीपा हराळ, विद्या नरवाडे, सरस्वती पडघने, परमिला सूर्यतळ, भाग्यश्री जाधव, नंदा सुरोशे, संतोषी गायकवाड, मोहन विश्वकर्मा, दिनेश गवळी, रवी बहादुरे, जानवळकर, माया ढवळे, तारा पवार आदी सहभागी होते.