आमडी व जुनोनी मिळून गटग्रामपंचयत आहे. मात्र, जुनोनीकडे ग्रामपंचायत नेहमीच दुर्लक्ष करते, असा नागरिकांचा आरोप आहे. नालेसफाई, ब्लिचिंग पावडर, दिवाबत्ती या सुविधाही पुरवीत नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी सोमवारी गावातील नाल्या साफ करून, तो कचरा बैलगाड्यांमध्ये टाकून पंचायत समितीमध्ये आणला. आपली कैफियत सभापती व बीडीओंकडे मांडली.
या आंदोलनात विनोद गराटे, दीपक गराटे, संदीप गराटे, विशाल वाघ, नितीन बोरकर, राजू घोडाम, संजय घोडाम, पूर्वा करपते, संभा करपते, परसराम करपते, प्रमोद जयस्वाल, प्रमोद खांडेकर, नीतू दांडेकर, नितीन घरोडे, राजू दांडेकर, देवराव दांडेकर, नितीन गरड, नरेश गोडे, नामदेव खडसंग, मोरेश्वर साखरकर, अंबादास साखरकर, शंकर साखरकर, भास्कर केळापुरे, दिनू केळापुरे, नकुल केळापुरे, मोतीराम साखरकर, सतीश डहाके, अमर साखरकर, रोशन नारनवरे, बबन कुडमते, राहुल कुडमते, वसंत वानखेडे, संदीप भोंग, गोपाल सावरकर, चंदू बोरकर, पंकज ठाकरे, रोहिदास चव्हाण, प्रफुल घोंगडे, गणेश चव्हाण, स्वप्निल जाधव, गजानन मंत्रीवार, रोहित आडे, गणेश चव्हाण, यशवंत राठोड, मनोज ढगले, नीलेश चव्हाण, आकाश राठोड, राहुल आडे आदींनी सहभाग घेतला.
बॉक्स
आज विस्तार अधिकारी गावात
सरपंचांनी लोकसंख्येच्या प्रमाणात सोईसुविधांसाठी निधी खर्च करावयास पाहिजे. याबाबत सरपंच यांना सांगितले, तसेच गुरुवारी चौकशीसाठी विस्तार अधिकारी यांना पाठवून त्यांच्या काय समस्या आहे, ते सोडविते, असे गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी सांगितले.