लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : आरोग्याच्या दृष्टीने जशी ग्राम स्वच्छता महत्वाची आहे, तशीच मानवाच्या दृष्टीने मन स्वच्छतासुद्धा अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत: मन आणि विचार स्वच्छ ठेवले, तर ग्रामविकास व्हायला विलंब लागणार नाही, असे मत न्यायाधीश चैतन्य कुलकर्णी यांनी व्यक्त केले.तालुक्यातील परसोडा येथे घंटागाड्यांचे लोकार्पण करताना ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त परसोडा येथे ग्रामसभा व ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत घंटागाडी लोकार्पण सोहळा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी सी.जी. चव्हाण, ठाणेदार यशवंत बाविस्कर, अॅड.प्रमोद चौधरी, विस्तार अधिकारी प्रफुल ठेंगेकर, ग्रामसेवक मंगल अंबुरे, पोलीस पाटील राजेश देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष रंगराव आडे, भाऊ बळवंते, विठ्ठल देशमुख उपस्थित होते. प्रथम गावातून फेरफटका मारून पाहुण्यांनी स्मशानभूमी सौंदर्यीकरण, ग्रामपंचायत कार्यालयात सौंदर्यीकरण बघून कौतुक केले. कार्यक्रमात गावात चांगले कार्य करणाऱ्या व्यक्ती व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांच्या हस्ते घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले.अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश चैतन्य कुलकर्णी यांनी परसोडा गावाचा आदर्श ईतर गावांनी घ्यावा, असे आवाहन केले. मनाच्या स्वच्छतेतून ग्राम स्वच्छता साधता येते, हे परसोडा ग्रामस्थांनी करून दाखविल्याबद्दल त्यांनी गावाचे कौतुक केले. संचालन सरपंच अतुल देशमुख यांनी केले. आभार मुख्याध्यापक बाबाराव वानखडे यांनी मानले.यशस्वीतेसाठी अरुण देशमुख, फुलसिंग राठोड, रमेश कोल्हे, सुदर्शन देशमुख, संतोष पत्रे, प्रशांत गुडे, ज्ञानेश्वर मिसाळ, गजानन शेळके, संगीत शेळके, नारायण सोळंके, विठ्ठल पारधी, प्रेमदास राठोड, संदीप राठोड, संतोष चौधरी, नारायण गुडे, शंकर कोल्हे, आदींनी परिश्रम घेतले. न्यायाधीश गावात आल्याने नागरिकांनी उत्साहात कार्यक्रमात सहभाग घेतला.
मनस्वच्छतेतून होते स्वच्छ ग्राम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 12:03 AM
आरोग्याच्या दृष्टीने जशी ग्राम स्वच्छता महत्वाची आहे, तशीच मानवाच्या दृष्टीने मन स्वच्छतासुद्धा अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत: मन आणि विचार स्वच्छ ठेवले, तर ग्रामविकास व्हायला विलंब लागणार नाही, असे मत न्यायाधीश चैतन्य कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देन्यायाधीशांचे मनोगत : परसोडा येथे घंटागाड्यांचे लोकार्पण