शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

आर्णी व जवळा येथे बंद

By admin | Published: January 15, 2015 10:59 PM

तालुक्यातील जवळा येथे झालेल्या महापुरुषांच्या पुतळा विटंबन प्रकरणी आर्णी, जवळा आणि महागाव कसबा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तर दिग्रस येथे मोर्चा काढून घटनेचा निषेध करण्यात आला.

घटनेचा निषेध : दिग्रस येथे मोर्चा, महागाव तहसीलदारांना निवेदन आर्णी : तालुक्यातील जवळा येथे झालेल्या महापुरुषांच्या पुतळा विटंबन प्रकरणी आर्णी, जवळा आणि महागाव कसबा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तर दिग्रस येथे मोर्चा काढून घटनेचा निषेध करण्यात आला. जवळा येथील घटनेच्या निषेधार्थ आर्णी येथील व्यापारपेठ सकाळपासून बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून नागरिकांचा एक मोर्चा आर्णी तहसील कार्यालयावर पोहोचला. त्यावेळी आरोपींना त्वरित अटक करा, अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी एन.डी. मनवर, अविनाश घाटे, सुधाकर कांबळे, दिलीप मनवर, रंजिता शिंदे, गणेश हिरोळे, संजय सुखदेवे यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. मोर्चात सुनील भगत, वसंत नगराळे, भारत काळपांडे, प्रदीप गायकवाड, दत्तराव भरणे यांच्यासह शेकडो महिला-पुरुष सहभागी झाले होते. यानंतर आर्णी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. दरम्यान जवळा येथील घटनेचा आर्णी तालुका भाजपाच्यावतीने निषेध करून आरोपीच्या अटकेची मागणी करणारे निवेदन तहसीलदारांना दिले. या निवेदनावर अनिल इंगोले, नरेंद्र देशमुख, सुमित छाजेड, भाऊसाहेब अत्रे, गजानन ठाकरे, सुरेश चिल्लरवार, लक्ष्मण परळीकर, जुनेद अली काजी, रुपेश टाक यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तर जवळा येथे बुधवारी रात्री आमदार राजू तोडसाम यांनी भेट देऊन नागरिकांना शांततेचे आवाहन केले. तर महागाव येथे घटनेच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली. निवेदन देताना माणिक मुनेश्वर, धम्मानंद कावळे, राहुल तायवाडे, प्रकाश डांगे, विष्णू चवरे, नितीन वाहुळे, प्रमोद बरडे उपस्थित होते. तर महागाव कसबा येथे जवळा घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला. लाडखेड ठाणेदाराला निवेदन देऊन आरोपीच्या अटकेची मागणी करण्यात आली. यावेळी किशोर बिहाडे, सुभाष बिहाडे, संजय देशपांडे, छोटू ठेकेदार, सुभाष राणे, विजय बिराडे, किशोर काकस आदी उपस्थित होते. (लोकमत चमू)