लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी आर्णी बंदची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत आर्णीत कडकडीत बंद पाळण्यात आला.मराठा क्रांती मोर्चा समिने बंदची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत सकाळपासून व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. मराठा समाज बांधव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर गोळा झाले. तेथे आरक्षण कसे गरजेचे आहे, याबाबत संदीप ढोले, किशोर रावते, माधवराव जाधव, विठ्ठल देशमुख, रमेश ठाकरे, अतुल देशमुख आदींनी मत व्यक्त केले. यानंतर शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. ही रॅली घोषणा देत मुख्य मार्गाने तहसीलवर धडकली.निवासी नायब तहसीलदार आर.बी. मांडेकर यांना आरक्षण मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी नीलेश गावंडे, शेखर खंदार, राजू विरखडे, नितेश बुटले, सचिन ठाकरे, सचिन शिंदे, अॅड.प्रमोद चौधरी, गुणवंत राऊत, दिनेश चौधरी, बबलू जाधव, मामा ठाकरे, रामेश्वर चौधरी, आशीर्वाद बुटले, छोटू देशमुख, भागेश राऊत, अभय राकेश, नीलेश बुटले आदींसह मराठा-कुणबी समाज बांधव उपस्थित होते.पोलिसांनी संपूर्ण रॅलीदरम्यान चोख बंदोबस्त ठेवला. बंदोबस्तासाठी अतिरीक्त कुमक मागविण्यात आली होती. उपविभागीय अधिकारी डॉ.नीलेश पांडे यांनी आंदोलनाला भेट दिली. ठाणेदार यशवंत बावीस्कर यांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त होता.
आर्णी येथे मराठा समाजातर्फे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 10:00 PM
मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी आर्णी बंदची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत आर्णीत कडकडीत बंद पाळण्यात आला.
ठळक मुद्देदुचाकी रॅली : व्यापारपेठ कडकडीत बंद