नागरिकांचा टपावर बसून प्रवास
पांढरकवडा : येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून टेम्पो, ट्रकच्या माध्यमातून धोकादायकरीत्या अनेक नागरिक टपावर बसून प्रवास करीत धोका पत्करत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, याकडे महामार्ग पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. अनेक वाहनांवर नागरिक बसून असतानाही वाहतूक पोलिसांना ते दिसत नाही काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबले जात आहेत.
ग्रामीण भागात बससेवा सुरू करा
पांढरकवडा : तालुक्यातील ग्रामीण भागात अजूनही काही ठिकाणी बससेवेची प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना बस नसल्याने शाळेत वेळेत पोहोचताना त्रास होत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे. ज्या गावात बस जात नाही, त्या गावातील नागरिकांना नाइलाजाने खासगी प्रवासी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे.