के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : उपविभागात येत असलेल्या राळेगाव तालुक्यातील वनालगतच्या २४ आणि कळंब तालुक्यातील ४२ याप्रमाणे ६६ गावांना सामूहिक वनाधिकार (वनहक्क) मिळाला आहे. राळेगावात पाच हजार ६००, तर कळंबमध्ये १३ हजार ६०० यानुसार १९ हजार हेक्टर क्षेत्रातील पट्टे या गावांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर बहाल करण्यात आले आहे.सामूहिक वनहक्कातून निस्तारासारखे हक्क, वनउपज गोळा करणे, विल्हेवाट लावणे यासाठी स्वामित्व हक्क, पाण्यातील मत्स्य व अन्य उत्पादने, चराई करणे, निरंतर वापर करण्यासाठी पारंपरिक सरझन व संवर्धन करण्यात आलेल्या वनस्रोतांचे संरक्षण, पुनर्निर्माण, संवर्धन व व्यवस्थापन करण्याचा हक्क, जैवविविधतेत प्रवेश मिळविण्याचा हक्क, जैविक विविधता, सांस्कृतिक विविधता यांच्याशी संबंधित बौद्धिक मालमत्ता व पारंपरिक ज्ञान मिळविण्याचा सामूहिक हक्क या प्रकारचे अधिकार आदिवासी बांधवांना आपली उपजीविका योग्यरितीने करण्याकरिता या सामूहिक वनहक्काचा आता फार मोठा लाभ होणार आहे. आतापर्यंत गावागावात स्थापन झालेल्या वनहक्क समित्यांना या अंतर्गत पुढे करावयाच्या पद्धतीविषयी माहिती वेळोवेळी घेण्यात आलेल्या बैठकीतून देण्यात आलेली आहे. यापूर्वीचे उपविभागीय अधिकारी संदीप अपार व विद्यमान उपविभागीय अधिकारी स्नेहा उबाळे यांनी याबाबत आदिवासी गावातील लोकांना मार्गदर्शन करतील.पेसा अंतर्गतच्या या गावांना आता उपजीविकेकरिता सन्मानाचा हा मार्ग शासनाने उपलब्ध करून दिला आहे. ग्रामसभा, वनहक्क समितीच्या माध्यमातून गावकऱ्यांना, आदिवासींना विकासाचा मार्ग खुला केला आहे. गरज आहे ती आता त्यांनी सामूहिकपणे कार्यप्रवण होण्याची.वनउपजाची मालकी गावाचीवनाधिकार मिळालेल्या गावांच्या वहिवाटीतील (पट्ट्यातील) वनक्षेत्रात मिळणाºया वनउपजांची मालकी गावांची राहणार आहे. गौण वनउपजाचे व्यवस्थापन करण्याचा व विक्रीचा अधिकार ग्रामसभेस राहणार आहे. राज्य शासनाने ३३ प्रकारचे वनउपज जाहीर केलेले आहे. त्याची मालकी या गावाकडे आता राहणार आहे. मूळ पाने, फुले, फळे, डिंक, मध, आपटा, तेंदूपत्ता, बांबू, लाख, रेशीम कीडे, गवत आदी बाबींचा त्यात समावेश आहे.उपविभागस्तर समितीतर्फे वैयक्तिक पट्टेराळेगाव २१ व कळंब तालुक्यातील १५ याप्रमाणे ३६ शेतकºयांना उपविभागीयस्तरीय समितीने वैयक्तिक वनहक्क पट्टे वाटप केलेले आहे. यात प्रत्येकाला सरासरी दीड-दोन हेक्टरचा पट्टा देण्यात आला आहे. पेसा अंतर्गतच्या गावांना आता उपजीविकेकरिता सन्मानाचा हा मार्ग शासनाने उपलब्ध करून दिला आहे.
६६ गावांना मिळाला सामूहिक वनहक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 6:00 AM
पेसा अंतर्गतच्या या गावांना आता उपजीविकेकरिता सन्मानाचा हा मार्ग शासनाने उपलब्ध करून दिला आहे. ग्रामसभा, वनहक्क समितीच्या माध्यमातून गावकऱ्यांना, आदिवासींना विकासाचा मार्ग खुला केला आहे. गरज आहे ती आता त्यांनी सामूहिकपणे कार्यप्रवण होण्याची.
ठळक मुद्देसंडे अँकर । राळेगावातील २४ व कळंब तालुक्यातील ४२ गावे, १९ हजार हेक्टर वनक्षेत्रातील पट्टे बहाल