शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
2
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
3
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
4
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
5
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!
6
शेवटी आईच ती! ९ महिन्यांच्या बाळाला वाचवलं, स्वत:चं बलिदान दिलं; काळजात चर्र करणारी घटना
7
काँग्रेसचा 'विजयी' फॉर्म्युला! लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही नेत्रदीपक कामगिरी करणार?
8
जगाच्या भुवया उंचावल्या! भारताच्या तीन युद्धनौका इराणला पोहोचल्या; इस्रायल कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची शक्यता असताना...
9
हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा
10
Apple देशातील 'या' शहरांमध्ये सुरू करणार नवे स्टोअर्स, महाराष्ट्रातील दोन शहरांची निवड
11
लेकीच्या जन्मानंतर दीपिका पदुकोण पहिल्यांदाच दिसणार? 'सिंघम अगेन' च्या ट्रेलर लाँचची चर्चा
12
"आज ५ लोक मरणार"; अमेठी हत्याकांडातील आरोपी चंदन वर्माने WhatsApp वर ठेवलेलं स्टेटस
13
३ ऑक्टोबर 'मराठी अभिजात भाषा दिवस' म्हणून साजरा होणार; मंत्रिमंडळाचा निर्णय
14
"आमची झोप उडालीय, भयंकर अस्वस्थ..." तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना शरद पवारांची मिश्किल टिप्पणी
15
मराठी मालिका ते थेट बिग बींचं KBC, अभिनेत्री शाल्मली टोळ्ये कशी बनली सेलिब्रिटींची स्टायलिस्ट? वाचा प्रेरणादायी प्रवास
16
Diffusion Engineers Share Price : पहिल्याच दिवशी ₹२०० पार पोहोचला 'हा' शेअर; बाजारात एन्ट्री घेताच अपर सर्किट; ११४ पट झालेला सबस्क्राइब
17
४ दिवसांनी गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, व्हिलचेअरवर दिसला अभिनेता, म्हणाला- "माझ्यासाठी..."
18
जवळ आले, तोंड दाबलं अन् नंतर...; मुंबईत CSMT रेल्वे स्थानकाजवळ महिलेवर बलात्कार
19
T20 WC 2024 : रोहित शर्मानं जे केलं तेच आम्हीही करू; हरमनप्रीत कौरनं सांगितलं टीम इंडियाचं ध्येय
20
Rakhi Sawant : Video - "स्मशानभूमीतून आईच्या अस्थी..."; ढसाढसा रडत राखीने मोदींकडे मागितली मदत

व्यावसायिक ६४ गॅस सिलिंडरच्या मालकाचा महिनाभरापासून शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 5:41 PM

दहेगाव येथे टँकरमधून गॅस रिफिलिंग : वडकी येथील पोलिसांनी केली होती कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क राळेगाव : दहेगाव येथील ढाब्यावर २८ ऑगस्ट रोजी एचपी गॅस कंपनीच्या टँकरमधून व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये गॅस भरताना वडकी पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी तिथे ६४ व्यावसायिक गॅस सिलिंडर, दोन वाहने आणि गॅस टँकर आढळून आले होते. वाहने जप्त करण्यात आली होती. दोन जणांना अटक करण्यात आली होती. परंतु, याठिकाणी आढळलेले ६४ गॅस सिलिंडर कोणाचे याचा शोध पोलिस महिनाभरापासून घेत आहे.

धाडीच्या कारवाईनंतर या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. मध्यंतरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पत्रानुसार गॅस टँकर आणि ६४ व्यावसायिक गॅस सिलिंडर खापरी येथील एच.पी. गॅस कंपनीकडे सुपूर्द करण्यात आले. एक महिन्याच्या प्रदीर्घ काळात धाडीत जप्त करण्यात आलेल्या व्यावसायिक सिलिंडरबाबत कोणत्याही व्यावसायिकाने त्यांचे गॅस सिलेंडर हरविले किंवा चोरीला गेले असल्याबाबतची तक्रार कोणत्याही पोलिस ठाण्यात केलेली नसल्याची माहिती आहे. 

दहेगाव धाब्याजवळच्या क्षेत्रात राहणाऱ्या व्यावसायिकांचे हे सिलेंडर आहे. या व्यावसायिकांनी कोणाच्यातरी मध्यस्ताच्या माध्यमातून हे सिलिंडर स्वस्तात गॅस रिफिलिंग करण्याकरिता दिले असल्याचा संशय आहे. मध्यस्थ गॅस एजन्सी किंवा हॉकर असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तपास करण्याची आवश्यकता आहे. तसेच, गॅस टँकर चालकांनी यापूर्वी असेच प्रकार केले होते की काय व अशा प्रकारात आणखी कोण सामील आहे याचा छडा लावण्याची गरज आहे. ६४ व्यावसायिक गॅस सिलिंडरबाबतचा तपास सुरू आहे, असे स्थानिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक देवकते यांनी प्रतिनिधीला सांगितले.

अनेक महिन्यांपासून सुरु होता प्रकार दहेगाव येथील ढाब्यावर मागील काही महिन्यांपासून टँकरमधून गॅस काढून सिलिंडरमध्ये भरण्याचा प्रकार सुरू होता. भरलेल्या सिलिंडरची वाहतूक करण्यासाठी स्पेशल वाहनेही तैनात करण्यात आली होती. पोलिसांनी धाड टाकून हा प्रकार उघडकीस आणला होता. परंतु, या प्रकारामागे आणखी कोण आहे याचा छडा लावण्यात आलेला नाही. गंभीर प्रकार असल्याने या प्रकरणात सखोल तपास होण्याची गरज आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ