शहरं
Join us  
Trending Stories
1
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
5
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
6
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
7
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
8
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
9
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
10
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
11
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
12
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
13
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
14
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
15
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
16
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
18
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
19
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
20
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ

पाथ्रटच्या आमझरे परिवाराला ३१ लाख रुपयांची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 5:00 AM

दारव्हा तालुक्याच्या पाथ्रट (देवी) येथील निळूनाथ नारायण आमझरे (४०), पत्नी निर्मला (३५) आणि मुलगा यश (१२) हे तिघे ६ ऑगस्ट २०२० रोजी दुचाकीने राळेगावकडे जात होते. दरम्यान, कळंब-राळेगाव मार्गावर रोही अचानक आडवा आल्याने दुचाकीला अपघात झाला. यात निळूनाथ व त्यांची पत्नी निर्मला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मुलगा यश याला यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथून नागपूरला हलविले. 

 लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दुचाकी अपघातात मरण पावलेल्या पाथ्रट येथील दाम्पत्याच्या परिवाराला ३१ लाख २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई वनविभागाकडून देण्यात आली. वनमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते यश (१२) व प्रणय (१५) आमझरे या मुलांकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला.दारव्हा तालुक्याच्या पाथ्रट (देवी) येथील निळूनाथ नारायण आमझरे (४०), पत्नी निर्मला (३५) आणि मुलगा यश (१२) हे तिघे ६ ऑगस्ट २०२० रोजी दुचाकीने राळेगावकडे जात होते. दरम्यान, कळंब-राळेगाव मार्गावर रोही अचानक आडवा आल्याने दुचाकीला अपघात झाला. यात निळूनाथ व त्यांची पत्नी निर्मला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मुलगा यश याला यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथून नागपूरला हलविले. अपघातानंतर जोडमोहा वनक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. रोही या वन्य प्राण्याच्या धडकेमुळेच हा अपघात घडल्याची खात्री केली. कळंब येथील क्षेत्र सहायक एल.के. उपाध्ये यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आणि वैद्यकीय अहवालावरून मृतासह गंभीर जखमीला वनविभागाच्या तरतुदीनुसार भरपाई देण्याचा प्रस्ताव सादर केला.या प्रस्तावावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ उपवनसंरक्षक विभागाला दिले. जखमी यश आमझरे याच्या उपचारासाठी एक लाख २५ हजार आणि दिवंगत निळूनाथ व त्यांच्या पत्नी निर्मला यांना प्रत्येकी १५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. यश व त्याचा भाऊ प्रणय यांच्या नावे हे अर्थसाहाय्य विभागून देण्यात आले. यशच्या उपचारासाठी एक लाख २५ हजार रुपयांचा निधीही देण्यात आला आहे. जिल्ह्यात रोही या वन्य प्राण्यामुळे झालेल्या अपघातात मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात धनादेश सुपूर्द करताना वनमंत्र्यांसह जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप भुजबळ, उपवनसंरक्षक केशव बाभळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :forest departmentवनविभाग