लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकांच्या बदल्या होऊनही रिलिव्ह करण्यात आले नाही. याविरोधात परिचारिकांनी बेमुदत उपोषण सुरू केले. अखेर चार दिवसांनी ९ परिचारिकांच्या ‘रिलिव्ह आॅर्डर’ काढण्यात आल्या. पण त्यातही सेवाज्येष्ठांना डावलून कनिष्ठांना प्राधान्य दिल्याने नर्सेस संघटनेने अधिष्ठातांच्या विरोधात शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.तीन महिन्यांपूर्वी १७ परिचारिकांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिका रूजू झाल्यानंतर बदली झालेल्या परिचारिकांना ‘रिलीव्ह’ करण्याच्या मार्गदर्शक सूचना होत्या. ९ परिचारिका त्यानुसार रूजू झाल्या. यामुळे ९ परिचारिकांना ‘रिलीव्ह’ करणे आवश्यक होते. मात्र अधिष्ठातांनी तसे केले नाही. याविरोधात महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस असोसिएशनने बेमुदत उपोषण सुरू केले. यानंतर अधिष्ठातांनी ९ परिचारिकांच्या बदलीचे आदेश काढले. यामध्ये सेवाज्येष्ठांना डावलण्यात आले. यामुळे अधिष्ठाता यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविली. यानंतर यादीत डावलल्याचा आरोप झालेल्या एका परिचारिकेची बदली रद्द करून सेवाज्येष्ठ परिचारिकेला स्थान देण्यात आले. अजूनही दोन सेवाज्येष्ठ परिचारिका डावलले. सर्वांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन कायम राहणार असल्याचे नर्सेस संघटनेच्या अध्यक्षा शोभा खडसे म्हणाल्या.
मेडिकलच्या डीनविरुद्ध पोलिसात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 10:37 PM
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकांच्या बदल्या होऊनही रिलिव्ह करण्यात आले नाही. याविरोधात परिचारिकांनी बेमुदत उपोषण सुरू केले. अखेर चार दिवसांनी ९ परिचारिकांच्या ‘रिलिव्ह आॅर्डर’ काढण्यात आल्या.
ठळक मुद्देपरिचारिकांवर अन्याय : सेवाज्येष्ठांना डावलून कनिष्ठांना ‘रिलिव्ह आॅर्डर’