देवराव फरताडे या शेतकऱ्याने २७ जुलैला राहत्या घरी विषारी कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली होती. पतीला मरणोत्तर न्याय मिळावा, यासाठी पीडित शेतकऱ्यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार केली आहे. मृत शेतकऱ्याने हिवरा मजरा येथे तीन एकर शेत विकत घेतले होते. या शेताचा कायदेशीर सातबारा तयार झाला. मात्र मोजणी शिटमध्ये भूमापक तोमस्कर यांनी घोळ केला होता. पहिल्या मोजणीत तीन हिस्से तर दुसऱ्या मोजणीत पाच हिस्से दर्शविण्यात आलें होते. त्यामुळे पीडित शेतकऱ्याला संपूर्ण शेतजमिनीचा ताबा मिळाला नव्हता. यात भूपाकाने चुकीच्या पध्दतीने मापन केल्याने हा घोळ झाला होता. त्यामुळे मृताचे मोठे नुकसान झाले. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. याविरुध्द प्रशासनाला इशारा दिला होता. मात्र या बाबीकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. अखेर या शेतकऱ्यांने विषारी द्रव प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. या आत्महत्येस भूमापक कोमल तुमस्कर, वासुदेव एकरे, राजू एकरे यांच्यासह इतर कारणीभूत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनिषा फरताडे यांनी केली आहे.
शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची पोलिसात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 4:42 AM