शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

‘मेडिकल’अभ्यागतांच्या वर्तणुकीची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 9:54 PM

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळातील काही सदस्यांकडून मिळणाºया वागणुकीविरोधात डॉक्टर आणि कर्मचाºयांनी एल्गार पुकारला आहे.

ठळक मुद्देमर्यादा ओलांडल्याचा आरोप : डॉक्टर-कर्मचाºयांचा रोष, अधिष्ठातांकडे मांडली कैफियत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळातील काही सदस्यांकडून मिळणाºया वागणुकीविरोधात डॉक्टर आणि कर्मचाºयांनी एल्गार पुकारला आहे. याबाबत अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांना निवदेन देऊन आपला रोष व्यक्त केला. अभ्यागत मंडळातील सदस्यांनी त्यांच्या सूचना थेट अध्यक्षांकडेच मांडाव्या अशीही मागणी केली आहे.शासनाच्या आदेशानुसार अभ्यागत मंडळातील सदस्यांना केवळ शिफारशी करण्याचा अधिकार आहे. याच मर्यादेत राहून त्यांनी रुग्णालय व महाविद्यालयाशी संबंधित मुद्यावर बैठकीमध्ये अध्यक्षांशी चर्चा करावी. या बैठकीला डॉक्टर्स व कर्मचाºयांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी उपस्थित राहील, असेही स्पष्ट केले आहे. विभागाच्या तक्रारी व सूचना मंडळाच्या सदस्यांनी अध्यक्षांकडे मांडाव्या त्यांनतर अध्यक्षांनी अधिष्ठाता यांना निर्देश द्यावेत. अधिष्ठांताच्या आदेशावरूनच आम्ही त्याची अंमलबजावणी करू, असे डॉक्टरांच्या संघटनेने म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण संघटनेचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, सचिव डॉ. गजानन मस्के यांनी निवेदन दिले आहे. अभ्यागत मंडळातील काही सदस्यांकडून जाणीपूर्वक असभ्य शब्दांचा वापर करून अधिकारी कर्मचाºयांचा अपमान केला जातो. हा प्रकार निंदनीय आहे. त्यांच्याकडून कर्मचाºयांचे मानसिक खच्चीकरण केले जात आहे. रुग्णसेवेसाठी सर्वांनीच समन्वय ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी कुणा एकाला टार्गेट करू नये, अशा मागणीचे निवेदन तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश राठोड, सचिव अविनाश जानकर यांनी अधिष्ठातांना दिले. या निवेदनाच्या प्रती राज्यपाल, वैद्यकीय शिक्षण सचिव आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाला पाठविल्या आहे.