शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

आढावा सभेत तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 10:24 PM

गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी पहिल्यांदाच वणी शहरात आढावा सभा घेतली.

ठळक मुद्देवणीत पहिल्यांदाच आयोजन : एसपींसह प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमतवणी : गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी पहिल्यांदाच वणी शहरात आढावा सभा घेतली. या सभेला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. यावेळी तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला. चार तास चाललेल्या या सभेला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.तक्रारींची संख्या लक्षात घेता शासनाच्या विविध विभागांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लाागले आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता आढावा सभेला प्रारंभ झाला. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी दीपक सिंगला, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, पंचायत समिती सभापती लिशा विधाते, उपसभापती संजय पिंपळशेंडे प्रामुख्याने उपस्थित होते. या आढावा सभेला तालुक्यातील अनेक गावातील सरपंच व नागरिकांनी हजेरी लावली. तसेच स्थानिक विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ना.अहीर यांनी विभागवार प्रगतीचा व तक्रारींचा आढावा घेतला. बहुतेक सरपंचांनी गावातील पाणी टंचाईचा विषय आढावा सभेत मांडला. यात वांजरी, गोवारी, नांदेपेरा, कुरई, शिंदोला, राजूर कॉलरी, कुंभारखणी, शिरपूर या गावांसह अनेक गावातील पाणी टंचाईची तिव्रता मंत्र्यांपुढे मांडली. शासनाने विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एक पोर्टल सुरू केले असल्याची माहिती दीपक सिंगला यांनी यावेळी दिली. वणी तालुक्यातील एसीसी कंपनी व वेकोलिकडून प्रकल्पग्रस्त शेतकरी व गावकºयांना होत असलेल्या त्रासाचा पाढाच नागरिकांनी वाचला. त्यावर संबंधित गावचे सरपंच व एसीसी, वेकोलिचे अधिकारी यांची उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी बैठक घेऊन समस्या निकाली काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज देण्यासाठी बँक टाळाटाळ करीत असल्याची बाब पुढे आली. त्यावर बँकेच्या अधिकाऱ्यांना ना.अहीरांनी चांगलेच खडसावले.राजूर कॉलरी येथील पाणी पुरवठा योजनेत अपहार होत असल्याची तक्रार सरपंचांनी केली. याची चौकशी करण्याचे आदेश वेकोलि अधिकाऱ्यांना देण्यात आले. अनेक गावातील सरपंचांनी अवैध दारू विक्री होत असल्याची तक्रार केली. त्यावर दारू विक्री करणाऱ्यांचे तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अहीर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले.राजेश कुळकर्णी यांनी उज्वला योजना, पंतप्रधान आवास योजना, दिनदयाल उपाध्याय कौशल्य विकास योजनांबाबत माहिती दिली. बीटी बियाणे फसवणुकीच्या तक्रारी दाखल करण्यासाठी कृषी अधिकारी अकारण बियाणांचे वेष्टन मागत असल्याच्या तक्रारी शेतकºयांनी केल्या. त्यावर ना.अहीरांनी कृषी अधिकाऱ्यांना शासनाचे परीपत्रकच दाखविले व केवळ बिलाच्या आधारे तक्रारी घेण्याच्या सूचना केल्या. या बैठकीत वीज वितरण कंपनी, एस.टी. महामंडळ, बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभागातील समस्यांचाही आढावा घेण्यात आला.