शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

चांगल्या कामाचे कौतुक, कामचुकारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 10:04 PM

सार्वजनिक बांधकाम विभाग शासनाचे प्रमुुख अंग असून या विभागात चांगले काम कराल तर शाबासकी मिळेल. मात्र कामात कुचराई केल्यास कारवाईला तयार राहा, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभियंत्यांना दिला.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील : खड्डे बुजविण्यासाठी डिसेंबरचा अल्टिमेटम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सार्वजनिक बांधकाम विभाग शासनाचे प्रमुुख अंग असून या विभागात चांगले काम कराल तर शाबासकी मिळेल. मात्र कामात कुचराई केल्यास कारवाईला तयार राहा, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभियंत्यांना दिला.येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात रविवारी सकाळी आढावा बैठकीत बोलताना त्यांनी हा इशारा दिला. त्यांनी रस्त्यांच्या डागडुजीसाठी बांधकाम विभाग यंत्रणेला डिसेंबर पर्यंतचा अल्टीमेटमही दिला. राज्यात आत्तापर्यंत कामात कुचराई करणाºया २०० अधिकारी, कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई केल्याचे त्यांनी उपस्थित अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच चांगले काम केल्याबद्दल दोन हजार अधिकारी, कर्मचाºयांना बढती दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ‘आता तुम्हाला काय हवं, हे तुम्हीच ठरवा’, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली.आढावा बैठकीत त्यांनी अधिकारी, कर्मचाºयांना काम करताना येणाºया अडचणींबाबत उघडपणे मत मांडण्याचे निर्देश दिले. रस्त्यांवरून जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. वाहनांची संख्यासुद्धा वाढली आहे. यामुळे रस्ते वारंवार खराब होतात. अ‍ॅप डाऊनलोड करून खड्ड्यांचा फोटो तक्रारकर्त्याला थेट मंत्रालयात पाठविता येतो. त्यासाठी मंत्रालयातील सर्व अधिकाºयांवर प्रत्येकी तीन जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे अधिकारी आपल्या जिल्ह्याचे पालक आहेत. या माध्यमातून पुढील दोन वर्षात महाराष्ट्रातील चित्र बदलण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.राज्यात मुख्यमंत्री सडक योजनेतून ३० हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. अंदाजपत्रकात जास्त कामे कशी समाविष्ट करता येईल, याबाबत नियोजन करण्यात आले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन हजार किलोमीटरसाठी ८०० कोटी मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले. यापैकी एक हजार किलोमीटरचे कंत्राट निघाले असून १५ दिवसात उर्वरित कामाला मंजुरी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचाºयांनी सामाजिक बांधिलकी जोपासून काम करावे, रस्त्यांचे काम हे स्वत:चे घर बांधत आहे, अशी भावना ठेवून करावे, असे आवाहन त्यांनी केले. नवीन योजना राबविताना कनिष्ठ कर्मचाºयांना विश्वासात घ्या, एखादी चूक झाल्यास ती त्याने आपल्याला सांगितली पाहिजे, अशी प्रतिमा तयार करा, असे आवाहनही चंद्रकात पाटील यांनी केले.दिग्रस येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता राजू चव्हाण आणि त्यांच्या सहकाºयांचा यावेळी पाटील यांच्याहस्ते उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. या बैठकीला पालकमंत्री मदन येरावार, आमदार डॉ. अशोक उईके, राजेंद्र नजरधने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य प्रादेशिक अभियंता चंद्रशेखर तुंगे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अधीक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के, अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार सचिन शेजाळ, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहेत्रे, संभाजी धोत्रे, रवींद्र मालवत यांच्यासह सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता उपस्थित होते.ग्रामीण रस्त्यांसाठी स्वतंत्र युनिटप्रधामंत्री सडक योजना आणि मुुख्यमंत्री सडक योजना जशा वेगळ््या आहे, त्याच धर्तीवर आता ग्रामीण रस्त्यांची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे न ठेवता त्यासाठी स्वतंत्र युनिट तयार केले जात असल्याचे पाटील यांनी सांगितले.मंत्र्यांच्या वक्तशीरपणामुळे अभियंत्यांची धावपळमुुबंई वरून आल्यानंतरही बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सकाळी ८.१० वाजता बैठक सुरू केली. मात्र तोपर्यंत अनेक अभियंते बैठकीला पोहोचले नव्हते. त्यांनी उशिरा बैठकीला हजेरी लावली. तब्बल पावणे दोन तास ही बैठक चालली. यात प्रत्येक बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील