ऑनलाईन लोकमतमहागाव : ऊस क्षेत्र वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना समृद्धीचे स्वप्न दाखवित नॅचरल शुगर कारखान्याने शेतकऱ्यांना ठिबक सिंचनसाठी कर्ज दिले. दोन वर्षात कर्ज कपातीची बोली करण्यात आली. मात्र एकाच वर्षात संपूर्ण कर्ज कपात केले जात असल्याने ऊस विकलेल्या शेतकऱ्यांच्या हाती एक दमडीही येत नाही. नॅचरल शुगरच्या या तुघलकी कारभाराने दुष्काळी वर्षात शेतकरी अडचणीत सापडले आहे.महागाव तालुक्यातील गुंज येथील सहकारी साखर कारखाना नॅचरल शुगरने विकत घेतला. त्यानंतर ऊस क्षेत्र वाढविण्यासाठी या कारखान्याने शेतकऱ्यांना वेगवेगळे आमिष दाखविले. अनेक शेतकऱ्यांनी या आमिषला बळी पडत त्यांच्या योजनांचा फायदा घेतला. त्यातीलच एक म्हणजे ठिबक सिंचन योजना होय. नॅचरल शुगर कंपनीच्या एन.साई मल्टीस्टेट कॉ.आॅप. संस्थेकडून शेतकऱ्यांना भरमसाठ व्याज आकारुन कर्ज दिले गेले. २०१६-१७ या वर्षात ऊस लागवड योजना राबविली. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी अशा गोंडस नावाखाली रोप, कांडी, ठिबक सिंचन पुरविण्यात आले. परंतु आता या शेतकऱ्यांकडून कारखाना सक्तीने वसुली करीत आहे. देविदास पुंड, मंगेश कदम, सचिन कदम, महेश कदम, पंजाबराव कदम या सारखणी येथील शेतकऱ्यांनी कार्यकारी संचालकांना २५ जानेवारी रोजी पत्र दिले.बोंडअळी आणि गारपीटीने आम्ही गारद झालो आहोत. उसाच्या येणे रकमेतून ठरल्याप्रमाणे एकच हप्ता वसूल करावा. उर्वरित रक्कम आमच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी केली. परंतु या पत्राचा कोणताही उपयोग झाला नाही. दोन हंगामाच्या कपातीची बोली करणाºया कारखान्याने दोनही हप्त्याची रक्कम एकाच वर्षी वसूल केल्याने शेतकºयांच्या हाती काहीच पडले नाही.कारखाना प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरेकारखान्याच्या या अन्यायकारक धोरणाविरुद्ध शेतकऱ्यांनी कारखान्याच्या अध्यक्षांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते दोन महिन्यांपासून साईडवरच आले नाही. त्यांचा फोनही पीए उचलतो आणि तो उडवाउडवीची उत्तरे देतो. त्यामुळे ठिबक सिंचनच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यात असंतोष पसरला आहे. ही खदखद केव्हाही बाहेर येऊ शकते.
ठिंबक सिंचन कर्जाची सक्तीने वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 10:18 PM
ऊस क्षेत्र वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना समृद्धीचे स्वप्न दाखवित नॅचरल शुगर कारखान्याने शेतकऱ्यांना ठिबक सिंचनसाठी कर्ज दिले. दोन वर्षात कर्ज कपातीची बोली करण्यात आली.
ठळक मुद्देनॅचरल शुगरचा कारभार : उसाची एक दमडीही ऊस उत्पादकांच्या हाती नाही