पुसद : लगतच्या श्रीरामपूर येथील गुरूदेव सेवा मंडळ आणि श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुसंस्कार शिबिर आणि कीर्तन महोत्सवाचा समारोप मंगळवारी झाला. या निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली होती. या शिबिरात तब्बल २३० विद्यार्थी सहभागी झाले होते. समारोपीय कार्यक्रमाला गुरूदेव सेवा मंडळाचे तालुका सेवा अधिकारी गणेश धर्माळे, श्रीरामपूरचे सरपंच नाना बेले, अॅड. रमेश पाटील, पंचायत समिती सदस्य अवधूत मस्के, मुख्याध्यापक अजय खैरे, मिलिंद उदेपूरकर, माणिकदास टोंगे, केंद्रप्रमुख निवृत्तीनाथ बैस्कार, केंद्रप्रमुख कडू, राजकुमार दिगडे, अंजली बेलोरकर, दीपिका महाजन, संगीता जगुरे, डॉ.विजय सारडा, प्रा.उज्ज्वला तिखे, प्रकाश वानरे, माधुरी वानरे, अशोक भगत, सुभाष जाधव, शिवशंकर नागरे, रमेश वानखेडे, बाबासाहेब नागठाणे, संजय ठाकूर, प्रमोद देशमुख, संतोष मोरे, वर्षा बोपिनवार उपस्थित होते. संचालन मुक्ता धर्माळे यांनी तर आभार प्रा.स्मिता पडोळे यांनी मानले. (प्रतिनिधी)
श्रीरामपूर येथे सुसंस्कार शिबिराचा समारोप
By admin | Published: May 19, 2016 2:12 AM