लोकमत न्यूज नेटवर्कसोनखास : यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा इंस्टिट्यूट आॅफ इंजीनियरींग अॅन्ड टेक्नॉलॉजीच्या (जेडीआयईटी) राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या विशेष शिबिराचा समारोप मंगळवारी नेर तालुक्यातील सोनखास येथे करण्यात आला. सात दिवसीय या शिबिराच्या माध्यामातून विविध उपक्रम राबविण्यात आले.समारोपिय सोहळ्याला परमाणू व दूरसंचार विभाग प्रमुख प्रा.डॉ.संजय गुल्हाणे, प्रा.डॉ.विवेक गंधेवार, प्रा.अनिल फेंडर, प्रा.सुनील पातालबंसी, प्रा. पवन मुखडकर, प्रा.पद्मिनी कौशिक, रासेयो कार्यक्रम आधिकारी प्रा.अभय राठोड, नेर पंचायत समितीचे माजी सभापती हेमंत कोटनाके, सरपंच सावित्री खाडे, उपसरपंच बरखा कोटनाके, ग्रामसेवक वैशाली थूल, मुख्याध्यापिक लता शंकरपुरे,पोलीस पाटील दिनेश पारधी, पांडुरंग भोयर आदी उपस्थित होते. यावेळी शिबिरात सहभागी विद्यार्थी अश्विनी पत्रीवार, मनीष कामावार, काजल जोशी, अंकुश वडतकर यांनी मनोगत व्यक्त केले.शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता, आरोग्य तपासणी, महिला बचतगट मार्गदर्शन, पर्यावरण जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर, बाल आरोग्य तपासणी आदी कार्यक्रम घेण्यात आले. या शिबिराला माजी शिक्षण मंत्री प्रा.वसंतराव पुरके, जिल्हा बँकेचे संचालन वसंतराव घुईखेडकर, सचिव जिरापुरे, प्रकाश वर्मा यांनी भेट दिली. यशस्वीतेसाठी प्रा.नितिन चव्हाण, प्रा.पियूष हेगू, प्रा.कोमल पुरोहित, प्रा.मयूर जिरापुरे, प्रा.आशिष माहूरे, प्रा.सोनल सावरकर, प्रा.मोनाली रंगोशे, प्रा.विद्याशेखर, प्रा.अभय राठोड, एनएसएस विद्यार्थी संयोजक मनीष कामावार यांनी परिश्रम घेतले. समारोपाच्या दिवशी गावकºयांच्या वतीने शिबिरार्थ्यांना भोजन देण्यात आले.
‘जेडीआयईटी’च्या रासेयो शिबिराचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 10:22 PM
यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा इंस्टिट्यूट आॅफ इंजीनियरींग अॅन्ड टेक्नॉलॉजीच्या (जेडीआयईटी) राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या विशेष शिबिराचा समारोप मंगळवारी नेर तालुक्यातील सोनखास येथे करण्यात आला.
ठळक मुद्देयवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा इंस्टिट्यूट आॅफ इंजीनियरींग अॅन्ड टेक्नॉलॉजीच्या (जेडीआयईटी) राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या विशेष शिबिराचा समारोप