लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : दररोजच्या आत्मशुद्धिसाठी पंचशीलाचे आचरण करण्याचे आवाहन पूज्य भदन्त व भिक्खू संघाने केले. महागाव येथे आयोजित महावंदना व धम्मदेसना शिबिराच्या मार्गदर्शप्रसंगी ते बोलत होते. भदन्त सदानंदजी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली भदन्त धम्मरत्न महाथेरो यांच्या हस्ते उशिबिराचे उद्घाटन झाले. अखिल भारतीय भिक्खू संघ व फुले आंबेडकरी साहित्य संसदेचे अध्यक्ष किशोर भगत यांनी प्रास्ताविकातून या मंगल सोहळ्याची माहिती दिली.शिबिरात विविध देशातील भन्तेनी आपले विचार व्यक्त केले. त्यांच्या आगमनाप्रसंगी समाजबांधवानी भिक्खू संघाचे स्वागत केले. संचालन नंदकुमार कावळे यांनी केले.शिबिराला महागाव तालुक्यासह लगतच्या तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आत्मशुद्धिसाठी पंचशीलाचे आचरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 10:10 PM
दररोजच्या आत्मशुद्धिसाठी पंचशीलाचे आचरण करण्याचे आवाहन पूज्य भदन्त व भिक्खू संघाने केले. महागाव येथे आयोजित महावंदना व धम्मदेसना शिबिराच्या मार्गदर्शप्रसंगी ते बोलत होते.
ठळक मुद्देभिक्खू संघ : महागाव येथे धम्मदेसना, धम्मवंदना