शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

विदर्भ राज्यद्रोह्यांचे डिपॉझिट जप्त करा

By admin | Published: February 10, 2017 1:55 AM

स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ही काँग्रेस पक्ष स्थापने पूर्वीची आहे. विदर्भ राज्याला काँग्रेस,

पत्रपरिषद : जांबुवंतराव धोटे यांचे आवाहन यवतमाळ : स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ही काँग्रेस पक्ष स्थापने पूर्वीची आहे. विदर्भ राज्याला काँग्रेस, शिवसेना, मनसे यांसारख्या राजकीय पक्षाकडून सातत्याने विरोध होत आहे. या पक्षांच्या उमेदवारांचे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत विदर्भातील जनतेने डिपॉझीट जप्त करावे, असे आवाहन विदर्भवादी नेते माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांनी पत्रपरिषदेतून केले. विदर्भ राज्य व्हावे असा ठराव १८८८ मध्ये घेण्यात आला होता. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची स्थापना झाली. आज तिच काँग्रेस वेगळ््या विदर्भ राज्याला विरोध करत आहे. त्यांच्या पाठोपाठ शिवसेना, मनसेकडूनही विरोध होत आहे. भाजपाकडून लवकर विदर्भ राज्याची घोषणा केली जाईल, देशात व राज्यातील भाजपा सरकर योग्य निर्णय घेत आहे. प्रधानमंत्री मोंदीनी घेतलेला नोटबंदीचा निर्णय योग्य असून त्याचे चांगले परिणाम दिसतील असेही धोटे म्हणाले. डोबिंवली येथे झालेल्या साहित्य संमेलनात मावळते अध्यक्ष सबनिस यांनी विदर्भ राज्याला विरोध केला. तेव्हा साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष काळे हे बसून ऐकत होते. विदर्भातील असूनही काळेंनी सबनिस यांना विरोध केला नसल्याचे ते म्हणाले. (कार्यालय प्रतिनिधी)