शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

शासकीय कार्यालयांमध्ये ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 11:33 PM

पाण्याच्या तुटवड्याने वसाहतीच नव्हेतर शासकीय कार्यालयातही हाहाकार उडाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीत पाणी पडद्याआडतहसीलची पाणपोई कोरडीबसस्थानकात ९ पैकी ६ तोट्या बंदअपंगांच्या प्रसाधनगृहाला ‘लॉक’पाण्यासाठी सर्वसामान्यांची फरपट

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाण्याच्या तुटवड्याने वसाहतीच नव्हेतर शासकीय कार्यालयातही हाहाकार उडाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे.यवतमाळ बसस्थानकावर जिल्ह्यासह परजिल्ह्यातून येणाºया नागरिकांची वर्दळ असते. या ठिकाणी पाय ठेवताच प्रवासी पाणी शोधतात. बसस्थानकाच्या मोठ्या पाणपोईवर धडकतात. या पाणपोईला नऊ नळाच्या तोट्या बसविल्या आहेत. सहा तोट्या बंद आहेत. इतर तोट्यांतील पाणी गरम असते. यवतमाळ अर्बन बँकेची खासगी पाणपोई आहे. या ठिकाणी बॅरलची व्यवस्था आहे. परंतु हे बॅरल दुपारपर्यंत येतच नाही.जिल्हाधिकारी कार्यालयात मोजकेच पाणी ठेवण्यात येते. नागरिकांच्या वर्दळीने हे पाणी कधी संपेल याचा नेमच नसतो. बचत भवनालगतच्या पाणपोईत पाणीच नसते. तेथून नागरिकांना नेहमीच रिकाम्या हाताने परतावे लागते. ज्या कार्यालयात काम आहे, त्या ठिकाणी पाणी कुठे मिळेल, अशी विचारणा करावी लागते. अनेकवेळा तर जिल्हाधिकाºयांच्या कक्षाबाहेरील पाणपोईच्या राजणातही पाणी नसते. अशावेळी नागरिकांना जिल्हा कचेरी बाहेरील दुकानातच पाण्यासाठी धाव घ्यावी लागते. या ठिकाणच्या काही कक्षात तर पाणी पडद्याआड जपून ठेवल्या जाते. तहसील कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयाची स्थिती अशीच आहे. तहसील कार्यालयातील पाणपोईत पाणीच नाही. तहसीलमध्ये अलीकडे खासगी वॉटर फिल्टर उभारले आहे. या ठिकाणी पाणी भरण्यासाठी हापशीचा वापर होत होता. आता हापशीच आटली आहे. यामुळे वॉटर फिल्टर टँकमध्ये पाणी नाही. या ठिकाणी विहीर आहे. ती कचºयाने भरली आहे. यामुळे तहसील कार्यालयात येणाºया नागरिकांना पाण्यासाठी शेजारच्या हॉटेलवरच धाव घ्यावी लागते. आरटीओ कार्यालयातील फ्रिजर बंद अवस्थेत पडला आहे. येथील गंजलेला फ्रिजर पाहून पाण्याची काय स्थिती असेल, याचा अंदाज येतो. कोषागार कार्यालयात फ्रिजर लावला आहे. मात्र त्या ठिकाणी पिण्याचे पाणी नसते. ग्रामपंचायत कार्यालयात नागरिकांची वर्दळ वाढली आहे. नवीन इमारतीमधील या कार्यालयात पाण्याची व्यवस्था नाही.अपंगांच्या प्रसाधनगृहाला कुलूपजिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयात नागरिकांची सर्वाधिक वर्दळ आहे. या ठिकाणी येणाºया अपंग नागरिकांना कुलूपबंद प्रसाधनगृहाने प्रचंड त्रास सहन करावा लागतो. उपविभागीय कार्यालयात तर अपंगांना वर चढण्यासाठी सोयच नाही. यामुळे या ठिकाणी अपंगांना उपविभागीय अधिकाºयाकडे हजर करताना प्रचंड सर्कस करावी लागते.कोंडवाड्यात पाणीच नाहीशहरातील मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताकरिता कोंडवाडा उभारण्यात आला आहे. तहसील कार्यालयाजवळ असलेला हा कोंडवाडा जनावरांसाठी शिक्षागृह झाला आहे. या ठिकाणी जनावरांना पिण्यासाठी पाणीच उपलब्ध नाही. चाराही उपलब्ध नाही. यामुळे या कोंडवाड्याकडे जनावर घेऊन जाण्याचे टाळलेच जात आहे.आधी नाश्ता, नंतर पाणीनागरिक हॉटेलमध्ये पाण्यासाठी गेले तर हॉटेल मालक सहसा पाणी देत नाही. या ठिकाणी प्रथम नाश्ता करा, अथवा चहा तरी घ्या. यानंतरच पिण्याचे पाणी दिले जाईल, असे बजावले जात आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई