शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

आॅनलाईन परीक्षा व भरतीने संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 9:50 PM

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक व शिपायाच्या १४७ जागांची नोकरभरती होणार आहे. मात्र ही भरती घेणारी संस्था कोण असावी हेच अद्याप निश्चित झालेले नाही. आॅनलाईन शैक्षणिक परीक्षा घेणे आणि आॅनलाईन भरती घेणे हे दोन्ही प्रकार सारखेच आहेत का याबाबत बँक सहकार आयुक्तांना मार्गदर्शन मागणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा बँकेची नोकरभरती : सहकार आयुक्तांना मार्गदर्शन मागणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक व शिपायाच्या १४७ जागांची नोकरभरती होणार आहे. मात्र ही भरती घेणारी संस्था कोण असावी हेच अद्याप निश्चित झालेले नाही. आॅनलाईन शैक्षणिक परीक्षा घेणे आणि आॅनलाईन भरती घेणे हे दोन्ही प्रकार सारखेच आहेत का याबाबत बँक सहकार आयुक्तांना मार्गदर्शन मागणार आहे.जिल्हा बँकेत अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नोकरभरती घेतली जात आहे. एनपीए वाढल्याने मागणीच्या अर्ध्याच जागांची भरती घेण्यास पुण्याच्या सहकार आयुक्तांनी परवानगी दिली आहे. ही भरती घेताना १५ जून २०१८ च्या शासन आदेशातील सूचना, शर्ती-अटी, निकषांचे काटेकोर पालन करण्याचे बंधन आहे. बँकेने नोकरभरतीसाठी एजंसी बोलविल्या. नऊ संस्थांचे अर्ज आले. मात्र त्यापैकी चार पात्र ठरू शकतात, त्यात एक दिल्लीची एजंसी आहे. मात्र पात्र ठरणाऱ्या या एजंसीजनी शैक्षणिक कामासाठी आॅनलाईन परीक्षा घेतल्या आहेत. या एजंसीजला नोकरभरतीसाठी आॅनलाईन परीक्षा घेतल्याचा अनुभव नाही. त्यामुळे शैक्षणिक कामासाठी घेतलेली आॅनलाईन परीक्षा नोकरभरतीच्या आॅनलाईन परीक्षेसारखीच गृहित धरावी का याबाबत जिल्हा बँकेत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी बँक आता सहकार आयुक्तांना मार्गदर्शन मागणार आहे.भरती आचारसंहितेत अडकण्याची भीतीनोकरभरतीची प्रक्रिया सुरू झाली असेल तर ती निवडणूक आचारसंहितेत अडकत नाही. मात्र जिल्हा बँकेच्या नोकरभरतीची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही. सहकार आयुक्तांकडून परवानगी येईस्तोवर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही भरती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची चिन्हे दिसू लागली आहे. 

टॅग्स :bankबँक