महागाईविरूद्ध काँग्रेसचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 10:08 PM2018-01-31T22:08:14+5:302018-01-31T22:08:38+5:30
केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जीवनावश्यक वस्तुंच्या किमती वाढत असल्याचा आरोप करून काँग्रेसने बुधवारी येथील तहसीलसमोर महागाईविरूद्ध धरणे दिले.
यवतमाळ : केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जीवनावश्यक वस्तुंच्या किमती वाढत असल्याचा आरोप करून काँग्रेसने बुधवारी येथील तहसीलसमोर महागाईविरूद्ध धरणे दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत फसव्या घोषणा करून सत्ता प्राप्त केली. त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत आहे. सिलींडर, पेट्रोल, डिझेलच्या किमती सतत वाढत आहेत. यामुळे काँगे्रसने बुधवारी धरणे दिले. कार्यकर्त्यांनी या वस्तुंना बांगड्यांचा हार घालून केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदविला. थाळीनाद करून सरकारविरोधी घोषणाबाजी केली.
यावेळी काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, महिला काँग्रेस अध्यक्ष माधुरी अराठे, राहुल ठाकरे, स्वाती येंडे, दुर्गा मिश्रा, दर्शना इंगोले, जावेद अन्सारी, सिकंदर शाह, नासिम बानो शब्बीर खान, छोटू पावडे, नगरसेविका ताहेराबी, टिपू देसाई, अरूण ठाकूर, उमेश इंगळे, चिंतामण पायघन आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.