लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे यासाठी घेतलेल्या कठोर भूमिकेबद्दल जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे बुधवारी राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत अभिनंदन करण्यात आले. त्यांच्यासोबतच अमरावती आणि अकोला जिल्हाधिकाऱ्यांचेही अभिनंदन करण्यात आले.अनेक राष्ट्रीय बँकांनी पीककर्ज वाटपाकडे दुर्लक्ष चालविले होते. चकरा मारूनही शेतकऱ्यांना कर्ज नाकारले जात होते. या तीनही जिल्हाधिकाऱ्यांनी अशा बँकांना ठणकावले. जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी स्टेट बँकेत असलेले शासकीय खाते बंद करण्याची भूमिका घेतली. यानंतर खरीप हंगामासाठी कर्जवाटप सुरू झाले. बैठकीत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीे या जिल्हाधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला. बैठकीत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या या कार्याची दखल घेतली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे कॅबिनेटमध्ये अभिनंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 10:42 PM