शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
2
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
6
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
7
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
8
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
9
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
10
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
11
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
12
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
13
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
14
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
15
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
17
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
18
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
19
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
20
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया

काँग्रेस, भाजपाचा सर्वाधिक सरपंच निवडीचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 10:10 PM

नोटाबंदी, जीएसटी, महागाई या मुद्यावर विरोधकांनी वातावरण कलूषित करूनही ग्रामीण जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपालाच कौल दिल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र पहायला मिळाले.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : भाजपा म्हणते, ९३ पैकी सर्वाधिक ४४ आमचे, काँग्रेस म्हणते, भाजपाला केवळ २२

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नोटाबंदी, जीएसटी, महागाई या मुद्यावर विरोधकांनी वातावरण कलूषित करूनही ग्रामीण जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपालाच कौल दिल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र पहायला मिळाले. जनतेतून थेट सरपंच निवडणुकीत ९३ पैकी सर्वाधिक ४४ जागांवर भाजपा पुरस्कृत उमेदवार निवडून आल्याचा दावा भाजपाने केला आहे. दरम्यान, सर्वाधिक ४२ सरपंच काँग्रेस पुरस्कृत असल्याचा दावा केला जात असल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नाहीत, परंतु भाजपाचे नेते आपले पॅनल किंवा आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवितात. त्याला पक्षाचा पाठिंबा जाहीर करतात. अशा पुरस्कृत उमेदवारांना विजयी करण्यात भाजपाने आघाडी घेतली आहे. यावेळी पहिल्यांदाच नगराध्यक्षाच्या धर्तीवर सरपंचाचीसुद्धा थेट जनतेतून निवडणूक घेण्यात आली. गावचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी जनतेतही प्रचंड उत्साह दिसून आला.जिल्ह्यात ९३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यापैकी ४४ जागांवर भाजपा पुरस्कृत उमेदवार सरपंच म्हणून निवडून आले. सरपंच निवडीवरून भाजपा आपलेच वर्चस्व असल्याचे सांगत असले तरी अनेक ठिकाणी सदस्य संख्येत जनतेने दुसºया गटाला कौल दिल्याचीही उदाहरणे पहायला मिळाली. सरपंच थेट जनतेतून असल्याने बहुतांश राजकीय पक्षांनी या एकाच पदाभोवती आपली शक्ती खर्ची घातली. सदस्य पदासाठी तेवढी चढाओढ पहायला मिळाली नाही. सरपंच जनतेतून असल्याने अनेकांनी सदस्य निवडणुकीत तेवढा इन्टरेस्ट घेतला नाही. कित्येकांनी बाहेर राहणेच पसंद केले. अनेक गावांमध्ये इच्छुकांची संख्या बरीच होती. मात्र ऐनवेळी आरक्षण सोईचे न आल्याने त्यांचा हिरमोड झाला.जिल्ह्यात यवतमाळ, राळेगाव, वणी, आर्णी व उमरखेड या विधानसभेच्या पाच जागा भाजपाकडे आहेत. दिग्रस-दारव्हाची जागा शिवसेनेकडे तर पुसदची राष्टÑवादी काँग्रेसकडे आहे. यातील बहुतांश आमदारांनी आपल्या मतदारसंघातील सरपंच निवडून आणण्यात यश मिळविले. जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी आपल्या मतदारसंघातील यवतमाळ तालुक्यात १६ पैकी १३ जागांवर भाजपा पुरस्कृत उमेदवार सरपंच म्हणून निवडून आणले आहेत. अन्य आमदारांनीही आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायती बºयापैकी कायम राखल्या. केवळ उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार त्याला अपवाद ठरले. त्यांना या तालुक्यात भोपळाही फोडता आला नाही. तेथे चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. त्यातील सरपंच पदाच्या दोन जागा काँग्रेसने तर एक राष्टÑवादीने मिळविली.धानोरा या गावातील सरपंच पद अनुसूचित जमातीच्या व्यक्तीसाठी आरक्षित होते. परंतु गावात या संवर्गाचा एकही उमेदवार मिळाला नाही. पर्यायाने तेथील सरपंच पद रिक्त राहिले आहे. नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीत देवराव पाटील पॅनलला पाच तर अन्य गटाला चार जागा मिळाल्या. उमरखेडमधील भाजपा आमदाराचे अपयश राजकीय गोटात चर्चेचा विषय ठरले आहे.विरोधकांचे फंडे फेलनोटाबंदी, जीएसटी, महागाई, पेट्रोल दरवाढ, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, कीटकनाशक फवारणीतील मृत्यू, अद्याप एक पैसाही न मिळालेली कर्जमाफी अशा विविध मुद्यांवर काँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना व अन्य पक्षांनी भाजपाविरोधात राळ उठविण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर भाजपाविरोधात जणू मोहीमच उघडली गेली. परंतु या मोहिमेचा सामान्य ग्रामीण जनतेवर फारसा परिणाम झाला नसल्याचे ग्रामपंचायत निवडणूक निकालात भाजपा समर्थित उमेदवारांना मिळालेल्या सकारात्मक कौलवरून स्पष्ट होते. ग्रामीण जनता आजही भाजपाच्या कारभारावर खूश असल्याचा दावा या पक्षांच्या नेत्यांकडून केला जात आहे. आगामी लोकसभा, विधानसभा स्वबळावर लढण्याची भाषा करणाºया शिवसेनेला विशिष्ट बेल्ट वगळता जिल्ह्यात सर्वत्र फारसे यश मिळविता आलेले नाही. अशीच काहीशी स्थिती काँग्रेसचीही राहिली आहे. राष्टÑवादीला तर पुसद विभागाच्या बाहेर फारसे यश मिळाले नाही.सर्वाधिक ४२ जागांसह काँग्रेस मोठा पक्ष : जिल्हाध्यक्षांचा दावाग्रामपंचायतीच्या थेट जनतेतून निवडल्या गेलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपाला केवळ २४ जागा मिळाल्या असून सर्वाधिक ४२ जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या आहेत, असा दावा जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. डॉ. मिर्झा म्हणाले, भाजपा पुरस्कृत केवळ २४ सरपंच निवडून आले आहेत. उर्वरित ६९ मध्ये सर्वाधिक ४२ काँग्रेस पुरस्कृत आहेत. या निवडणुकीत काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष राहिला आहे. भाजपाच्या चुकीच्या ध्येय धोरणामुळे आणि केवळ आश्वासनांच्या खैरातमुळे ग्रामीण जनतेने भाजपाला स्पष्टपणे नाकारले आहे. काँग्रेस पक्षसंघटन बांधणीत आणि भाजपाचे खरे रुप जनतेपुढे आणण्यात आणखी प्रयत्न करणार असून आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे निकाल यापेक्षाही सरस राहतील, असा दावा डॉ. मिर्झा यांंनी केला आहे. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील यवतमाळ तालुक्यामध्ये १६ पैकी भाजपाला केवळ चार जागा मिळाल्याचे सांगत काँग्रेस पुरस्कृत सरपंच पदाचे उमेदवार सात जागांवर विजयी झाल्याचा दावाही डॉ. मिर्झा यांनी केला आहे. भाजपाने दिलेली आकडेवारी खोटी असून आपण गावनिहाय काँग्रेसचे विजयी उमेदवार सांगू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.दिग्रस, दारव्हा, वणीत सेना तर पुसदमध्ये राष्टÑवादीभाजपाचे झरीमध्ये चार पैकी दोन, दारव्हा आठ पैकी एक, दिग्रस पाच पैकी तीन, मारेगाव नऊ पैकी तीन, पुसद १२ पैकी दोन, आर्णी सात पैकी तीन, राळेगाव आठ पैकी पाच, घाटंजी चार पैकी दोन, वणी १८ पैकी नऊ तर यवतमाळ तालुक्यातील १६ पैकी १३ जागांचा समावेश आहे.काँग्रेसला १८, राष्टÑवादीला १२, शिवसेना १३ तर सहा जागांवर अपक्ष उमेदवार सरपंच म्हणून निवडून आले.दिग्रस, मारेगाव, राळेगाव, वणी या तालुक्यांमध्ये अपक्षांना लॉटरी लागली.राष्टÑवादी काँग्रेसची घौडदौड केवळ पुसद विभागात पहायला मिळाली.शिवसेनेने दारव्हा, दिग्रस, वणी या तालुक्यांमध्ये सरपंचाच्या अधिक जागा निवडून आणल्या.राळेगावसह अनेक ठिकाणी सरपंच पदावर भाजपा व अन्य पक्ष दावा करीत आहेत. त्यामुळे आकड्यांचा खेळ दिसतो आहे.नेर तालुक्यातील सातेफळ ही ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात होती. मात्र यावेळी काँग्रेसने ती सेनेकडून खेचून आणली. त्याच वेळी भाजपानेही या जागेवर आपला दावा सांगितला आहे.सरपंच पदाच्या ९३ पैकी ४४ जागांवर भाजपा पुरस्कृत उमेदवार विजयी झाले आहेत. जिल्ह्यात भाजपाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल पाहता ग्रामीण जनता आजही भाजपावर खूश असल्याचा हा पुरावा आहे.- राजेंद्र डांगेजिल्हाध्यक्ष, भाजपा.