शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
2
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
3
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
4
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
5
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
6
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
7
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
8
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
9
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
10
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
11
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
12
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
14
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
15
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
16
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
17
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
18
सत्यपाल मलिक करणार मविआचा प्रचार; मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची घेतली भेट
19
गुजरातच्या 'गिफ्ट सिटी' सारखे आर्थिक केंद्र आता मुंबईत
20
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...

काँग्रेस दिल्लीत, भाजपा दाभडीत

By admin | Published: May 18, 2017 12:45 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाभडी गावासाठी काहीच केले नाही, याचे स्मरण करून देण्यासाठी काँग्रेसची नेते मंडळी बुधवारी दिल्लीला रवाना झाली.

‘चाय पे चर्चा’चे स्मरण : भाजपाची सारवासारव लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाभडी गावासाठी काहीच केले नाही, याचे स्मरण करून देण्यासाठी काँग्रेसची नेते मंडळी बुधवारी दिल्लीला रवाना झाली. तर इकडे दाभडीतील विकास कामांच्या भूमिपूजनासाठी भाजपाचे मंत्री, आमदार दाभडीत पोहोचल्याने तेथे विसंगत राजकीय चित्र पहायला मिळाले. तीन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी या गावातून देशभरातील शेतकऱ्यांशी ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमातून संवाद साधला होता. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, भाजपाची सत्ता दिल्यास शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील, असे मोदींनी आश्वस्त केले होते. मोदी देशाचे पंतप्रधान झाले. शेतकरी व जनतेने त्यांना एकहाती सत्ता दिली. परंतु आजही शेतकरी उपेक्षितच आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचे वार त्याच्यावर सुरू आहे. शेतकरीच नव्हे तर मोदींनी जेथून संवाद साधला ते दाभडी गावही तीन वर्षानंतरसुद्धा उपेक्षित आहे. तीन वर्षानंतर दाभडीची स्थिती पूर्वीप्रमाणे कायम आहे. याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार व भाजपाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे दिल्लीत धडकणार आहेत. तेथे १८ मेच्या सायंकाळपासून जंतर-मंतरवर काँग्रेस धरणे आंदोलन करणार आहे. या आंदोलनासाठी बुधवारी काँग्रेसचे कार्यकर्ते यवतमाळातून दिल्लीसाठी रवाना झाले. काँग्रेसच्या या आंदोलनाची ‘चर्चा’ झाल्याने भाजपाने दोन-तीन दिवसांपासूनच सारवासारव सुरु केली होती. अपेक्षेनुसार भाजपाने दाभडीत बुधवारी विकास कामांचे भूमिपूजन केले. त्यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार प्रामुख्याने उपस्थित होते. दाभडीचे वास्तव दाखविण्यासाठी काँग्रेसवाले दिल्लीत गेले आणि भाजपावाले दाभडीत आल्याच्या या प्रकाराची जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा आहे. नरेंद्र मोदींच्या घोषणेकडे लक्ष वेधण्यासाठी दोन वर्षांपूर्वी काँग्रेसने दाभडीतच ‘चाय की चर्चा’ हा कार्यक्रम घेतला होता. भाजपाने त्यावेळी दाभडी गावावर विकासाचा फोकस निर्माण करू, असे सांगितले होते. हे गाव दत्तक घेण्याची घोषणाही केली गेली होती. मात्र प्रत्यक्षात काहीही झाले नाही. दाभडीतील भूमिपूजन कार्यक्रमात या गावाचा किती व कसा विकास केला आणि करणार हे पटवून देण्याचा प्रयत्न भाजपाच्या नेते मंडळींनी केला.