उमरखेड बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 10:28 PM2018-10-29T22:28:06+5:302018-10-29T22:28:14+5:30
उमरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८संचालकासाठी झालेल्या निवडणूकीचा निकाल आज सायंकाळी जाहीर झाला . या निवडणुकीत चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये काँग्रेसच्या परिवर्तन पॅनलने १८ पैकी १o जागा जिंकून वर्चस्व प्रस्तापित केले.
यवतमाळ: उमरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८संचालकासाठी झालेल्या निवडणूकीचा निकाल आज सायंकाळी जाहीर झाला . या निवडणुकीत चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये काँग्रेसच्या परिवर्तन पॅनलने १८ पैकी १o जागा जिंकून वर्चस्व प्रस्तापित केले . तर शिवसेना भाजपाप्रणित वसंतराव नाईक शेतकरी विकास आघाडीला ७ जागांवर समाधान मानावे लागल तर राष्ट्रवादी प्रणीत पॅनलला अवघी १ जागा मिळाली .
उमरखेड बाजार समितीची यंदा झालेली निवडणूक व निवडणूकीमध्ये झालेला प्रचार चांगलाच चर्चत राहीला एकीकडे कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी फिसकटली तर दुसरीकडे भाजप -शिवसेनेने युती केली. त्यामुळे निवडणूक रिंगणात तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले होते .कॉग्रेस नेते रामदेवसरकर माजी आमदार विजय खडसे व तातू देशमुखांनी एकत्रीतरित्या निवडणूक प्रचाराची धूरा सांभाळली त्यामुळे पॅनलला विजय मिळाला. तथापी देवसरीगणातून तालूका अध्यक्ष दत्तराव शिंदे यांचा झालेला पराभव काँग्रेसच्या मोठI जिव्हारी लागला आहे .
दुसरीकडे भाजपा -शिवसेना युतीमुळे बाजार समितीवर बहूमताने पुन्हा सत्तIअबाधीत ठेवण्याचे प्रकाश पाटील देवसरकरांचे स्वप्न या निवडणूक निकालाने भंगले आहे . तथापीचातारीगणातून त्यांचे भाकटे बंधू व माजी सभापती कृष्णा पाटील देवसरकर यांचा मोठा विजय त्यांना दिलासा देणारा ठरला . स्वबळावर या निवडणूक रिंगणात ऊतरलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसला निकाला अंती आपण किंगमेकरच्या भूमिकेत राहू अशी अपेक्षा होती परंतू पण त्यांना अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले .
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
मुळावा -दगडूजी चव्हाण ( काँग्रेस )
पोफाळी -उशाताई जाधव ( शिवसेना -भाजप )
बेलखेड -सुदर्शन ठाकरे ( शिवसेना -भाजप )
मार्लेगाव -जयनारायण नरवाडे ( शिवसेना -भाजप )
सुकळी -बाळासाहेब नाईक ( शिवसेना -भाजप )
उमरखेड - मायाबाई रावते ( काँग्रेस )
बिटरगांव ( बु ) - दत्तराव रावते ( काँग्रेस )
विडूळ -गजानन बोन्सले( काँग्रेस )
देवसरी -शामराव वानखेडे ( शिवसेना -भाजप )
चातारी -कृष्णा पाटील देवसरकर ( शिवसेना -भाजप )
ढाणकी- बाळासाहेब चंद्रे ( काँग्रेस )
निंगणूर -सुनिल गव्हाळे (काँग्रेस )
कुरळी- अविनाश जाधव ( राष्ट्रवादी )
भवानी -रघूनाथ बेले ( काँग्रेस )
खरबी -दिलीप जाधव ( शिवसेना -भाजप )
हमाल मापारी -अजमतखॉ पठान -( काँग्रेस )
व्यापारी -शोधशाम भट्टड ( काँग्रेस )
व्यापारी -विनय कोडगीरवार ( काँग्रेस )