लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : जिनिंग पाठोपाठ काँग्रेसने आता कृषी उत्पन्न बाजार समितीवर झेंडा फडकविला आहे. काँग्रेसप्रणीत पॅनलचे बाळासाहेब चंद्रे यांची सभापती, तर दगडू चव्हाण यांची उपसभापती निवड झाली आहे.काँग्रेसने परत सहकार क्षेत्रात पाय रोवण्यास सुरूवात केली. बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणीत पॅनलने १८ पैकी दहा जागांवर विजय संपादन करून स्पष्ट बहुमत प्राप्त केले. त्यानंतर सोमवारी सभापती, उपसभापती पदाची निवड झाली. त्यात काँग्रेस प्रणीत पॅनलचे बाळासाहेब चंदे्र यांची सभापती, तर उपसभापती म्हणून दगडू चव्हाण यांची दहा विरूद्ध आठ मतांनी निवड झाली. पीठासीन अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली.सभापती पदासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी केली होती. काँग्रेसच्या काही संचालकांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न केले. काँग्रेसच्या निष्ठावंत संचालकांनी त्यांच्या प्रलोभनाला दाद दिली नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. विरोधी संचालकांनी गुप्त मतदान घेण्याची मागणी केली. काँग्रेस संचालकांनी हात उंचावून मतदान घेण्याची मागणी केली. त्यानुसार पीठासीन अधिकाऱ्यांनी पारदर्शक पद्धतीने हात उंचावून मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली. यात सभापती पदासाठी काँॅग्रेसचे बाळासाहेब चंद्रे यांना दहा, तर विरोधी कृष्णा देवसरकर यांना आठ मते मिळाली. उपसभापती पदासाठीही काँग्रेसचे दगडू चव्हाण यांना दहा, तर विरोधी अविनाश जाधव यांना आठ मते मिळाली.यावेळी बाळासाहेब भट्टड, दत्तराव रावते, सुनील गव्हाळे, गजानन बोंसले, रघुनाथ बेले, विनय कोडगिरवार, अजमल खा पठाण, कृष्णा देवसरकर, जयनारायण नरवाडे, नारायण नरवाडे, बाळासाहेब नाईक, श्यामराव वानखेडे, अविनाश जाधव, दिलीप जाधव, माया रावते, उषा जाधव उपस्थित होते.विजयी मिरवणूकनिवड होताच काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नंतर बाजार समितीतून काँग्रेस कार्यालयापर्यंत मिरवणूक काढली. यावेळी माजी आमदार विजय खडसे, डॉ.अनंत कदम, तातू देशमुख, जिल्हा परिषदेतील गटनेते राम देवसरकर, काँग्रेस तालुका अध्यक्ष दत्तराव शिंदे, शहराध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नारायणदास भट्टड, नगरसेवक, सोनू खतीब, प्रेमराव वानखेडे व सहकार क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
उमरखेड बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 10:03 PM
जिनिंग पाठोपाठ काँग्रेसने आता कृषी उत्पन्न बाजार समितीवर झेंडा फडकविला आहे. काँग्रेसप्रणीत पॅनलचे बाळासाहेब चंद्रे यांची सभापती, तर दगडू चव्हाण यांची उपसभापती निवड झाली आहे.
ठळक मुद्देसभापतिपदी बाळासाहेब चंद्रे : उपसभापतिपदी दगडू चव्हाण यांची दहाविरुद्ध आठ मतांनी निवड