लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात पाणीटंचाईचा उद्रेक झाला असून संतप्त यवतमाळकर आता रस्त्यावर उतरले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेऊन रिकामे मडके आणि दारूच्या बॉटल फोडण्यात आल्या. नगरपरिषद आणि जिल्हा कचेरीवरही धडक दिली. शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या टँकरच्या पाण्यासाठी जिल्हा कचेरीवर धडकल्या. तर पिंपळगाव परिसरातील महिलांनी बायपासवर तब्बल चार तास वाहतूक रोखून धरली. पाण्याचे टँकर आल्यानंतरच आंदोलन मागे घेतले. शहरातील पाणीटंचाईने आता उग्ररुप घेतले असून संतप्त नागरिकांनी प्रशासनाची बोलतीच बंद केली आहे.काँग्रेसचा राडानियोजनशून्य कामाच्या पद्धतीमुळे शहरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पालकमंत्र्यांनी विशेष प्रयत्न करून शहरातील बंद झालेली दारू दुकाने सुरू करून शौकिनांची तहान भागविली. आता पाणीटंचाई दूर करण्यासाठीही त्यांनी धडाडी दाखवावी, असा आक्रोश करीत मंगळवारी काँग्रेसच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला.सर्वप्रथम मोर्चेकरी नगरपरिषद कार्यालयापुढे गोळा झाले. तेथे घोषणा दिल्या जात असतानाच पाण्यासाठी आणखी एक मोर्चा पालिकेवर धडकला. उमरसरा, संकटमोचन रोड परिसरातील मोर्चा आल्यानंतर दोन्ही मोर्चांनी पालकमंत्र्यांच्या घराकडे कूच केले. तेथे प्रचंड पोलीस तैनात करण्यात आला होता. दत्तचौक मार्गाने मोर्चा पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा धडकल्यानंतर महिलांनी रिकामे मडके फोडून निषेध केला. एक ते दीड तास घोषणाबाजी सुरू होती. मोर्चेकऱ्यांनी पालकमंत्र्यांना फोन करून चर्चेसाठी बाहेर या, म्हणून विनवणी केली. मात्र, पालकमंत्री आले नाही.दारू दिली आता पाणीही द्यापालकमंत्री न आल्याने संतप्त महिलांनी बांगड्या फोडून ‘पालकमंत्री हाय हाय’, ‘पालकमंत्री राजीनामा द्या’, ‘या सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा दिल्या. तर ‘दारू दिली आता पाणीही द्या’ असे नारे लावत दारूच्या बॉटलही फोडण्यात आल्या.महिला पोलिसाच्या डोळ्याला दुखापतदारूच्या फोडलेल्या बॉटलचा एक काचेचा तुकडा उडून बंदोबस्तावरील महिला पोलिसाच्या डोळ्याला लागून दुखापत झाली. पोलिसांनी मोर्चेकºयांना दमदाटी करून निघून जाण्यास सांगितले. शेवटी मोर्चेकरी घोषणाबाजी करत निघून गेले. यावेळी पालकमंत्र्यांच्या घरापुढे फुटलेल्या बांगड्या, मडक्यांच्या तुकड्यांचा खच पडला होता. या मोर्चात महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष माधुरी अराठे, माजी आमदार नंदिनी पारवेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मनिष पाटील, नगरसेवक चंद्रशेखर चौधरी, नगरसेविका उषा दिवटे, दर्शना इंगोले, पल्लवी रामटेके, वैशाली सवई, विशाल पावडे, घनश्याम अत्रे, दिनेश गोगरकर, प्रदीप डंभारे, सिकंदर शाह, विक्की राऊत, कौस्तुभ शिर्के, ललित जैन, अरुण ठाकूर, रितेश भरूड, नीलेश पाटील, कृष्णा पुसनाके, सतीश जयस्वाल, सुबोध भेले, प्रकाश मिसाळ, उमेश इंगळे, लकी जयस्वाल, आदींनी पुढाकार घेतला होता.शिवसेनेच्या टँकरला पाणी द्याकाँग्रेसने पाण्यासाठी मोर्चा काढलेला असतानाच शिवसेना महिला आघाडीने जिल्हा कचेरीवर धडक दिली. ज्योती चिखलकर यांच्या नेतृत्वात टँकरला पाणी देण्याची मागणी केली. आमदार तानाजी सावंत यांच्या सौजन्याने शिवसेना शहरात मोफत पाणीपुरवठा करीत आहे. पिंपळगाव येथील विहीर, वारको ले-आऊटलगत विहिरीवरून टँकरला पाणी द्यावे, अशी मागणी केली. यावेळी बबिता गुरनुले, ललिता गुरनुले, वर्षा राऊत, अरुणा तिजारे, उर्मिला उके, मिनल इंगळे, पूजा गवई, अर्चना इंगळे, वैशाली इंगळे, शिला भोयर, रुपाली लेदे, प्रतिभा आदे, आरती हुडुरकर आदी उपस्थित होत्या.
हे तर काँग्रेसचे राजकारण- पालकमंत्रीमोर्चेकºयांना निघून जाण्यास पोलिसांनी भाग पाडल्यावर पालकमंत्री मदन येरावार निवासस्थानाबाहेर आले. प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, बेंबळाच्या पाण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. टंचाई जनतेला आहे, कंत्राटदाराला थोडीच आहे? पाणीपुरवठ्याची तारीख जाहीर केल्याने काम गतीने होत आहे. काँग्रेसवाल्यांना राजकारण करायचे आहे. १५ वर्षांत त्यांनी त्यांच्या नेत्याला प्रश्न का विचारले नाही? जनता आम्हाला सहकार्य करीत आहे.
पिंपळगाव बायपासवर महिलांचा चार तास चक्काजामपिंपळगाव परिसराकडे नगरसेवक किंवा प्राधिकरण लक्ष द्यायला तयार नाही. प्रशासनाकडे वारंवार चकरा मारूनही प्रश्न न सुटल्याने प्रभाग चारमधील संतप्त महिलांनी मंगळवारी दुपारी चक्काजाम आंदोलन केले. लोहारा-वाघापूर-पिंपळगाव बायपासवर शेकडो महिलांनी एकमेकींचा हात धरून वाहतूक अडवून धरली होती. त्यांच्या सोबतीने पुरुष आणि छोटी मुलेही रस्त्यावर उतरले होते. ट्रक, कन्टेनर अशा जड वाहनांची रांग लागली. तर दुचाकी चालकांनाही जाऊ देण्यास महिलांनी नकार दिला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यावरही महिला ऐकायला तयार नव्हत्या. जोपर्यंत पाणी मिळत नाही, तोपर्यंत हटणार नाही, असा आक्रोश त्या सतत करीत होत्या. आम्ही पालिकेशी बोललो, २-३ तासात दोन टँकर येतील, असे पोलिसांनी सांगूनही महिला हटल्या नाही. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी देशमुख आले. परंतु, त्यांनाही महिलांनी दाद दिली नाही. समजावून सांगण्यापेक्षा पाणीच आणून द्या, असा घोषा सुरूच होता. पिंपळगाव परिसरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये मोडणाºया सर्वच वॉर्डांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. सुर्वेनगर, बालाजी पार्क, दोनाडकर ले-आऊट, गजानननगर या भागात तर पिण्यासाठीही पाणी नाही. मुख्याधिकारी अनिल अढागळे, प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय बेले, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, नगरसेवक तेलंग आदींच्या भेटी घेऊनही काम झाले नाही. शेवटी मंगळवारी ४ तास चक्काजाम केल्यावर प्रशासन हादरले. आजूबाजूच्या प्रभागातील नगरसेवकही पोहोचले. शिवसेनेतर्फे दोन टँकर सायंकाळी ५ वाजता पोहोचल्यावरच आंदोलन मागे घेण्यात आले. वनिता धोटे, वनिता महल्ले, कांता बोबडे, वैशाली गजभिये, सीमा धोटे, शीतल ढोले, चंदा काळे, शुभांगी गचके, सरिता देवकते, वर्षा कानतोडे, कुसूम बोरकर, सरला चन्ने, नंदा भगत, निर्मला भोयर, लिलाबाई धोटे, सविता निकोडे, रंजिता जयसिंगपुरे, चंद्रकला येडके, रिता चिंचोळे, संगीता जवके, आशा कदम, माधुरी बरडे, तारा रामटेके, छबूताई कोथळे, रोशनी चारमोडे, वंदना ढोले, रेखा भरभडे, संजय चुनारकर, श्रीपाद देशपांडे, साबळे, नितीन महल्ले, अंकुश ढगे, मिलिंद गजभिये, आकाश देऊळकर, महादेव सिंगनजुडे, अविनाश धोटे, सचिन कदम आदींसह शेकडो नागरिक आंदोलनात उतरले होते.