मारेगावात कॉंग्रेसचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 09:33 PM2018-11-03T21:33:06+5:302018-11-03T21:33:35+5:30
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या घेऊन तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो शेतकरी बांधव सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या घेऊन तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो शेतकरी बांधव सहभागी झाले होते.
मारेगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या अनेक ज्वलंत समस्या आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधी व प्रशासन शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घेत नसल्याने वैतागला आहे. त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा काँग्रेसच्या कार्यालयापासून निघून तहसील कार्यालयावर धडकला. तहसील कार्यालयात मोर्चा पोहोचल्यावर त्याठिकाणी सभा घेण्यात आली.
यावेळी माजी आमदार वामनराव कासावार, बाजार समितीचे सभापती नरेंद्र ठाकरे, जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती अरूणा खंडाळकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सभेनंतर तहसीलदार विजय साळवे यांना निवेदन देण्यात आले. यशस्वितेसाठी तालुकाध्यक्ष अनिल देरकर, पं.स.सभापती शीतल पोटे, शंकर मडावी, नारायण देरकर, रवी पोटे, यादवराव काळे, रवींद्र धानोरकर, आकाश बदकी, शरिफ अहेमद शफिक अहेमद, डॉ.भास्कर महाकुलकर, दुष्यंत जयस्वाल, उदय रायपूरे, नंदू आसूटकर, प्रमोद कोहळे यांनी सहकार्य केले.