लोकमत न्यूज नेटवर्कवणी : एनआरसी व सीएए हे नागरिकत्व दुरूस्ती विधेयक त्वरित मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी गुरूवारी कॉंग्रेसच्यावतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वणी, झरी व मारेगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाने संसदेत नागरिकत्व दुरूस्ती विधेयक पारित केले आहे. हे विधेयक संविधानाच्या विरोधात आहे. या विधेयकामुळे समानतेच्या अधिकाराचा भंग होत असल्याचा आरोप यावेळी माजी आमदार वामनराव कासावार यांनी केला. धर्माच्या आधारावर नागरिकत्व देणे हे भारतीय राज्य घटनेचे उल्लंघन असल्याचेही ते म्हणाले.नागरिकत्व दुरूस्ती विधेयक हे बहुजनविरोधी असून बहुमताच्या भरवशावर केंद्र सरकार या देशावर कायदे लादत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी वसंत जिनींगचे अध्यक्ष अॅड.देविदास काळे, कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष पुरूषोत्तम आवारी, मोरेश्वर पावडे, वणीच्या माजी नगराध्यक्ष शालिनी रासेकर, रफिक रंगरेज, समाजवादी पार्टीचे रज्जाक पठाण यांचीही भाषणे झाली. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.या आंदोलनात वणीसह मारेगाव आणि झरी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी सीएए आणि एनआरसीच्या विरोधात काही काळ घोषणाबाजीसुद्धा केली.या आंदोलनात यवतमाळ जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ओम ठाकूर, वणी तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विवेक मांडवकर, मारेगाव तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल देरकर, वणी शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे, वणी शहर माजी अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर, इजहार शेख, भास्कर गोरे, वणी तालुका महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्ष वंदना धगडी, निलीमा काळे, शाहीदभाई, अशोक नागभीडकर, अभिजीत सोनटक्के यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
एनआरसीविरुद्ध वणीत काँग्रेसचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 6:00 AM
माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाने संसदेत नागरिकत्व दुरूस्ती विधेयक पारित केले आहे. हे विधेयक संविधानाच्या विरोधात आहे. या विधेयकामुळे समानतेच्या अधिकाराचा भंग होत असल्याचा आरोप यावेळी माजी आमदार वामनराव कासावार यांनी केला. धर्माच्या आधारावर नागरिकत्व देणे हे भारतीय राज्य घटनेचे उल्लंघन असल्याचेही ते म्हणाले.
ठळक मुद्देएसडीओ कार्यालयासमोर ठिय्या : वणी, झरी, मारेगावचे कार्यकर्ते सहभागी