लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा/आर्णी : केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेसच्यावतीने सोमवारी दारव्हा आणि आर्णी येथे जनसंताप मोर्चाचे आयोजन केले होते. दारव्हा येथे राहुल ठाकरे यांनी तर आर्णी येथे माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. आर्णीत बैलबंडी मोर्चा काढण्यात आला होता.दारव्हा येथे काँग्रेस कार्यालयाजवळून बसस्थानकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात माजी नगराध्यक्ष सय्यद फारूक, अशोकराव चिरडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरकर, सूत गिरणीचे उपाध्यक्ष प्रकाश नवरंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ सिंहे, सिद्धार्थ गडपायले, ज्ञानेश्वर कदम, गुलाब राठोड, रमेश ठक, हेमंत चिरडे, मेहमूद अली आदी उपस्थित होते.आर्णी येथे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात बाजार समितीसमोरुन बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरीताई आडे, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, किरणताई मोघे, पंचायत समिती सभापती सुरेश जयस्वाल, नगर परिषद उपाध्यक्ष राजू वीरखेडे, नगरसेविका ज्योती उपाध्ये, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मनीष पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील भारती, माजी नगराध्यक्ष आरिज बेग, अनिल आडे, जितेंद्र मोघे, माजी जिल्हा परिषद सदस्य मिनाक्षी राऊत, साजीद बेग, अॅड. प्रदीप वानखडे, विलास राऊत, बाळासाहेब शिंदे, राजू गावंडे, माधव राठोड, विजय मोघे, अतुल देशमुख, नीलेश बुटले, गणेश मोरे, अमोल मांगूळकर, खुशाल ठाकरे, छोटू देशमुख, उद्धवराव भालेराव, नरेश राठोड, अजित राठोड सहभागी झाले होते. या मोर्चात शेतकरी आणि महिलांचा मोठा सहभाग होता.या आहेत मागण्यायवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, भारनियमन कमी करावे, हमीभावाने शेतमाल खरेदी करावा, खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर भाव द्यावा, जाहीर झालेली कर्जमाफीची रक्कम तत्काळ शेतकºयांच्या खात्यात जमा करावी, फवारणीमुळे मृत्युमुखी पडलेले आणि विषबाधितांना आर्थिक मदत करावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
आर्णी व दारव्हा शहरात काँग्रेसचा जनसंताप मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 10:10 PM
केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेसच्यावतीने सोमवारी दारव्हा आणि आर्णी येथे जनसंताप मोर्चाचे आयोजन केले होते.
ठळक मुद्देभाजपा सरकारचा निषेध : संतप्त शेतकºयांचा उत्स्फूर्त सहभाग