नरेंद्र मोदी नालायक, भिकार माणूस, जनसंघर्ष यात्रेत काँग्रेस नेत्यांची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 02:43 PM2018-12-04T14:43:38+5:302018-12-04T19:41:25+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना काँग्रेसच्या नेत्यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे.

Congress leader's attack on PM Narendra Modi in Jan Sanghsh Yatra | नरेंद्र मोदी नालायक, भिकार माणूस, जनसंघर्ष यात्रेत काँग्रेस नेत्यांची जीभ घसरली

नरेंद्र मोदी नालायक, भिकार माणूस, जनसंघर्ष यात्रेत काँग्रेस नेत्यांची जीभ घसरली

Next

यवतमाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना काँग्रेसच्या नेत्यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. यवतमाळमध्ये जनसंघर्ष यात्रेला संबोधित करताना काँग्रेस नेते वसंत पुरके आणि शिवाजीराव मोघे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पातळी सोडून टीका केली. यावेळी नरेंद्र मोदी हे 'भिकार',  'नालायक' आहेत अशा शब्दात काँग्रेच्या ज्येष्ठ नेत्यांनी मोदींना टीकेचे लक्ष्य केले. 

केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा सरकारविरोधात काँग्रेसने सुरू केलेली जनसंघर्ष यात्रा आज यवतमाळ येथे होती. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. मोदींवर टीका करताना काँग्रेस नेते वसंत पुरके म्हणाले की, ''नरेंद्र मोदींसारखा भिकार माणूस या देशात झाला नाही.'' तर ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांनाही मोदींवर टीका करताना स्वत:वर नियंत्रण राखता आले नाही. '' देशवासीयांना नरेंद्र मोदींना मोठ्या अपेक्षेने सत्ता दिली. मात्र हा माणूस नालायक निघाला." असे मोघे म्हणाले. 


यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री आ. नसीम खान, वसंत पुरके, शिवाजीराव मोघे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे आदी नेते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

Web Title: Congress leader's attack on PM Narendra Modi in Jan Sanghsh Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.