काँग्रेस, राष्ट्रवादीचे जिल्हा कचेरीवर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:17 PM2018-09-25T22:17:32+5:302018-09-25T22:18:38+5:30
राफेल लढाऊ विमान खरेदी महाघोटाळ्याची कॅगमार्फत चौकशी करावी या प्रमुख मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने मंगळवारी येथील तिरंगा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातील काँग्रेसचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राफेल लढाऊ विमान खरेदी महाघोटाळ्याची कॅगमार्फत चौकशी करावी या प्रमुख मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने मंगळवारी येथील तिरंगा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातील काँग्रेसचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या आंदोलनात अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव यशोमती ठाकूर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी आडे, माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे, प्रा.वसंतराव पुरके, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सचिव संध्याताई सव्वालाखे, माजी आमदार वामनराव कासावार, विजयराव खडसे, कीर्ती गांधी, विजयाताई धोटे, नंदिनी पारवेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल ठाकरे, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबासाहेब गाडे पाटील, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष माधुरीताई अराठे, शहर महिला अध्यक्ष उषाताई दिवटे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मनीष पाटील, जीवन पाटील, काँग्रेसचे यवतमाळ शहर अध्यक्ष चंदू चौधरी, नगरसेवक बबलू देशमुख, वैशाली सवई, छोटू पावडे, जावेद अन्सारी, आरीज बेग, साजीद बेग, जिल्हा परिषद सभापती अरुणा खंडाळकर, सदस्य स्वाती येंडे, डॉ.मोहंमद नदीम, अशोक बोबडे, सिकंदर शाह, जितेेंद्र मोघे, दिनेश गोगरकर, संजय ठाकरे, जाफर खान, अतुल राऊत, अनिल गायकवाड, घनश्याम अत्रे, प्रदीप डंभारे आदी उपस्थित होते. काँग्रेसने प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तिरंगा चौकातच शेतकरी, शेतमजुर, कर्मचारी, व्यापारी आणि जनसामान्याच्या प्रश्नावर तसेच महागाईच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी युती भाजपा सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग, ज्येष्ठ नेते आमदार मनोहरराव नाईक, माजी आमदार संदीप बाजोरिया, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव घारफळकर, डॉ. आरती फुपाटे, माजी उपाध्यक्ष सदबाराव मोहटे, मुबारक तंवर, माजी सभापती प्रा.शिवाजी राठोड, सुभाष ठोकळ, अॅड. शंकरराव राठोड, जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष क्रांती धोटे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, वर्षाताई निकम, सतीश भोयर, मनीषा काटे, नरेश ठाकूर, निलेश देशमुख, रियासत अली, नंदू कुडमेथे, वणीचे डॉ. महेंद्र लोढा आदी उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयावर दोन्ही काँग्रेसचा जोर
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या मंगळवारच्या आंदोलनात यवतमाळचे शासकीय कृषी महाविद्यालय परत द्या, ही प्रमुख मागणी दिसून आली. येथे मंजूर झालेले शासकीय कृषी महाविद्यालय मुख्यमंत्र्यांच्या जन्मगावी मुल येथे पळविण्यात आले. त्यावर महाविद्यालय पळवूनही लोकप्रतिनिधी गप्प कसे ? असा सवाल ‘लोकमत’ने उपस्थित केला होता. याची दखल घेऊन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या महाविद्यालयासाठी सक्रिय झाले. दोन्ही प्रमुख विरोधी पक्षांनी आपल्या मागण्यांमध्ये कृषी महाविद्यालय परत देण्याची मागणी नोंदविली आहे.