लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढी विरोधात आवाज उठवत युवक काँग्रेसने ‘भडका तेल मोदी फेल’ हे अभिनव आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी वाहनधारकांना आणि पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांना गुलाबाचे फुल देऊन गांधीगिरी केली. दरवाढी बाबत शासनाचे उपहासात्मक आभार मानले.शनिवारी स्थानिक बसस्थानक चौकात युवक काँग्रेसने आंदोलन केले. आंदोलकांनी नारेबाजी करीत सरकारचा निषेध नोंदविला. भडका तेल मोदी फेल, अशा घोषणा देण्यात आल्या. बसस्थानक चौकातून निघालेली रॅली दत्त चौक मार्गे शहरातून फिरली. यावेळी आंदोलकांनी पेट्रोल ग्राहकांना गुलाब पुष्प दिले. आंदोलनाचे नेतृत्व लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल ठाकरे यांनी केले. नगरसेवक चंद्रशेखर चौधरी, वैशाली सवई, पल्लवी रामटेके, माधुरी अराठे, अनिल गायकवाड, अनिल देशमुख, संजय ठाकरे, स्वाती येंडे, बाळू काळे, सिकंदर शाह, कौस्तुभ शिर्केे, रितेश भरूट, कृष्णा पुसनाके, अजय किन्हीकर, देवीदास अराठे, रंजित पटेल, कुणाल जतकर, पारस अराठे, नितीन गुघाणे, हिरा मिश्रा, मनिष बोनकीले आदी उपस्थित होते.
पेट्रोल दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 10:02 PM
पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढी विरोधात आवाज उठवत युवक काँग्रेसने ‘भडका तेल मोदी फेल’ हे अभिनव आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी वाहनधारकांना आणि पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांना गुलाबाचे फुल देऊन गांधीगिरी केली. दरवाढी बाबत शासनाचे उपहासात्मक आभार मानले.
ठळक मुद्देभडका तेल, मोदी फेल : पेट्रोलपंपावर गुलाबाचे फुल देऊन गांधीगिरी