पंचायत समिती शिवसेनेकडे : जिल्हा परिषदेत सेना, राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागानरेश मानकर पांढरकवडापांढरकवडा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या आठही गणाचे निकाल धक्कादायक लागले असून जिल्हा परिषद गटाच्या दोन जागा काँग्रेसला, एक शिवसेनेला तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली.पंचायत समितीच्या आठ जागांपैकी पाच जागा प्राप्त करुन शिवसेनेने बहुमत प्राप्त केले. उर्वरित एक जागा काँग्रेसने,एक जागा भाजपने तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसने प्राप्त केली.पहापळ जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या सुरचिता पाटील निवडून आल्या. त्यांनी शिवसेनेच्या कविता राठोड यांचा पराभव केला. पाटील यांना ६,५११ तर राठोड यांना ४,९८६ मते मिळालीत. खैरगाव जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या वैशाली राठोड निवडून आल्या. त्यांनी भाजपच्या मनिषा वासेकर यांचा पराभव केला. राठोड यांना ६७२३ तर वासेकर यांना ५,८१० मते मिळाली. मोहदा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे निमिश मानकर निवडून आले.त्यांनी काँग्रेसचे प्रकाश मानकर यांचा पराभव केला निमेश मानकर यांना ५१७२ तर प्रकाश मानकर यांना ३,३०९ मते मिळाली. पाटणबोरी जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे गजानन बेजंकीवार निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे श्रीनिवास नालमवार यांचा पराभव केला. बेजंकीवार यांना ६,३२७ मते मिळाली तर नालमवार यांना ५,५८६ मते मिळाली.पहापळ पचायत समिती गणातून शिवसेनेच्या अनुराधा वेट्टी निवडून आल्या.त्यांनी काँग्रेसच्या संजीवनी सुरपाम यांचा पराभव केला. वेट्टी यांना २,७३५ तर सुरपाम यांना २,६६४ मते मिळाली. आकोली बु.गणात शिवसेनेचे संतोष बोडेवार यांचा निसटता विजय झाला. त्यांनी भाजपच्या किशोर देशट्टीवार यांचा केवळ पाच मतांनी पराभव केला. बोडेवार यांना २,८२२ मते तर देशट्टीवार यांना २,८१७ मते मिळाली. खैरगाव बु.गणात काँग्रेसच्या उज्वला बोंडे निवडून आल्या. त्यांनी भाजपच्या विद्या राठोड यांचा पराभव केला. बोंडे यांना ३,६८५ मते तर राठोड यांना २,७७७ मते मिळाली. सायखेडा गणात भाजपच्या शिला गेडाम निवडून आल्या. त्यांनी काँग्रेसच्या नलू धुर्वे यांचा पराभव केला. गेडाम यांना ३,२६७ तर धुर्वे यांना २,८४६ मते मिळाली. मोहदा गणात शिवसेनेचे पंकज तोडसाम निवडून आले. त्यांनी राकॉंचे गजानन मडावी यांचा पराभव केला. तोडसाम यांना १,९३६ तर मडावी यांना १८१० मते मिळाली. करंजी गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र नंदुरकर निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे संजय कुंडलवार यांचा पराभव केला.नंदुरकर यांना ३००४ मते तर कुंडलवार यांना २५८९ मते मिळाली. बोथ गणात शिवसेनेच्या इंदू मिसेवार निवडून आल्या.त्यांनी काँग्रेसच्या सुवर्णा परचाके यांचा पराभव केला. मिसेवार यांना २६८७ तर काँग्रेसच्या परचाके २५९० मते मिळाली. पाटणबोरी गणात शिवसेनेचे राजेश पसलावार निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे स्वामी कोरेड्डीवार यांचा पराभव केला. पसलावार यांना २८०३ मते तर कोरेड्डीवार यांना २६०८ मते मिळाली. पांढरकवडा शहरातील जिड्डेवार सांस्कृतिक भवनात सकाळी १० वाजतापासून चोख पोलीस बंदोबस्तात मतमोजणीला प्रारंभ झाला.
पांढरकवड्यात काँग्रेस दोन जागांवर विजयी
By admin | Published: February 24, 2017 2:38 AM