ऑनलाईन लोकमतदारव्हा : वाढत्या महागाईच्या विरोधात तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, माजी नगराध्यक्ष सै. फारूक सै. करीम, तालुका अध्यक्ष प्रकाश नवरंगे, शहराध्यक्ष सिद्धार्थ गडपायले, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मनमोहनसिंह चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उत्तमराव शेळके उपस्थित होते. वजाहत मिर्झा यांनी सरकारच्या धोरणावर टीका करताना या सरकारमुळे शेतकरी, सामान्य नागरिक यांच्यासह सर्वच घटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महागाईवर अंकुश लावण्यात सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. मान्यवरांचे मार्गदर्शन झाल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात पांडुरंग भालेराव, गुलाबराव राठोड, के.एच. जुमळे, गुलाबराव चव्हाण, डॉ. दिलीप मिरासे, विजय वानखडे, सुनील तडके, ज्ञानेश्वर खोडे, विवेक ठाकरे, नीरज नरवडे, विजय पाचकोर, विजय गोकुळे, जगन पाटील, माधुरी गडपायले, निरंजन पाटील, बंडू ठाकरे, दीपक राऊत, अशोक जयस्वाल, रघुनाथ जाधव, विठोबा कसंबे, केशव खोडे, रमेश ठक, वसंत सवाई, मधुकर मुधाने, बाबाराव राऊत, जमन काझी, रामहरी गावंडे, राहुल चेटुले, अनिल मोहिते, कैलास करतो, राजू चवात, गुणवंत गावंडे, ज्ञानेश्वर मिरासे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
दारव्हा येथे काँग्रेसचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 9:57 PM